Paithan Crime | बिडकीन एमआयडीसी परिसरात दोन तरुणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ

एकाच वेळी मृत्यूचा मार्ग स्वीकारण्यामागील कारणांचा शोध सुरू
Bidkin MIDC death case
बिडकीन एमआयडीसी परिसरात दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ Pudhari
Published on
Updated on

Bidkin MIDC death case

पैठण: पैठण तालुक्यातील बिडकीन एमआयडीसी परिसरात मंगळवारी (दि. २८) सकाळी दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांची नावे गणेश काकासाहेब झिरपे (वय २३, रा. सूर्या उद्योगनगर, बिडकीन) आणि सचिन भगीरथ आरगडे (वय २९, रा. धनगर पिंपरी शेवगा, जि. जालना) अशी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या वेळी काही नागरिक मॉर्निंग वॉक करत असताना रस्त्याच्या कडेला दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. त्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या बिडकीन पोलिसांनी पाहणी केली असता दोघेही तरुण मृत अवस्थेत आढळले.

Bidkin MIDC death case
Chhatrapati Sambhajinagar : कांदा बियाणे उत्पादनात घसरण

घटनास्थळाजवळ एमएच 20 एफएक्स 6845 क्रमांकाची हिरो कंपनीची मोटरसायकल, इंडोसल्फान विषारी औषधाचा डबा, इंग्रजी दारूची बाटली, दोन ग्लास, बिसलेरी पाण्याची बाटली तसेच दोघांचे मोबाईल फोन आढळून आले.

यानंतर पोलिसांनी मृतांची ओळख पटवून पंचनामा केला. सहाय्यक फौजदार अशोक सोकटकर यांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.

Bidkin MIDC death case
Chhatrapati Sambhajinagar News : पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील ६३ पुलांची तपासणी

या दोन्ही तरुणांनी एकाच वेळी मृत्यूचा मार्ग का स्वीकारला, यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिडकीन पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news