

क्रांतीचौक उड्डाणपुलावरील घटना
जालन्याहून खुलताबादच्या उरुसाला निघाले, पण वाटेतच गाठले काळाने हुल दिल्याने दुचाकी दुभाजकावर आदळली
छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद मृत समीर शहा किरकोळ धक्का लागल्याने येथील उरुसासाठी अतिशय उत्साहाने निघालेल्या जालन्यातील तरुणांच्या दुचाकीला क्रांती चौक उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. एका अज्ञात वाहनाचा तिघेही रस्त्यावर कोसळले. आणि दुभाजकावर धडकल्याने गंभीर जखमी दोघांचा मृत्यू झाला. तर एक जण सुदैवाने बचावला आहे. हा अपघात बुधवारी (दि.२६) दुपारी चुन्नीलाल पेट्रोलपंपाजवळ मृत परवेज शेख क्रांतीचौक उड्डाणपूल उतरताना घडला.
परवेज अफसर शेख (१७) आणि समीर शागीर शहा (२०) अशी मृतांची नावे आहेत तर, अर्शद मजार शहा (१७, तिघेही रा. शास्त्री मोहल्ला, जालना) हा गंभीर जखमी असून त्याच्या डोक्याला जखम असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीनिवास रोयलावार यांनी दिली.
ईद-ए-मिलादच्या निमित्ताने खुलताबाद येथे भरणारा मोठा उरूस पाहण्यासाठी जालन्यातील शास्त्री मोहल्ला भागातील ६ ते ७ जिवलग मित्रांनी एकत्र वर्गणी गोळा करून जाण्याचे नियोजन केले होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास हे सर्व मित्र ३ ते ४ दुचाकींवरून खुलताबादकडे जाण्यासाठी निघाले. परवेज, समीर आणि अर्शद हे तिघे एकाच दुचाकीवर स्वार होते. क्रांती चौक उड्डाणपूल उतरत असताना चुन्नीलाल पेट्रोलपंपाजवळ एका वाहनाचा त्यांच्या गाडीला किरकोळ स्पर्श झाला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकाला धडकली.
ईद-ए-मिलादच्या दिवशीची काळाचा घाला
जालना येथील परवेझ आणि समीर दोघे अन्य मित्रांसोबत आनंदाने ईद-ए-मिलादचा सण साजरा करून खुलताबाद येथील ऊरूसासाठी दुचाकीने निघाले होते. मात्र संभाजीनगर येथील क्रांती चौक उड्डाणपुलावर काळाने त्यांच्यावर घाला घातला. ईद-ए-मिलादच्या दिवशीच आणि एकाच गल्लीतील दोन्ही जिवलग मित्रांच्या अशा अपघाती मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.