छ.संभाजीनगर : शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मावस भावांचा बुडून मृत्यू

संजरपूर शिवारातील घटना
Chhatrapati Sambhajinagar News
शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मावस भावांचा बुडून मृत्यू झाला.
Published on
Updated on

गंगापूर : गंगापूर तालुक्यातील संजरपूर शिवारातील एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मावस भावांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी (दि.२) दुपारी तीनच्या सुमारास घडली. रोहित रमेश भांगे (२२, रा. जळका, ता. नेवासा) व धनंजय आण्णासाहेब सोनवणे (२८, रा. शिंदेवाडी) अशी या मृत भावांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजरपूर शिवारातील एका शेततळ्यात रोहित भांगे व धनंजय सोनवणे हे दोघे दुपारी तीनच्या सुमारास पोहण्यासाठी गेले होते. मात्र, तळ्यातील शेवाळामुळे त्यांना बाहेर येता आले नाही. त्यांनी ठिबक सिंचनाच्या नळीचा आधार घेण्याचा प्रयत्न केला, मात्र नळी तुटल्याने ते दोघेही पाण्यात बुडाले. ही बाब शेजारील नातेवाईकांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी शेततळ्याकडे धाव घेत त्यांना तळ्यातून बेशुद्धावस्थेत बाहेर काढले. त्यानंतर त्यांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी कुंभारें यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. का. मनोज घोडके करत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news