ट्रक ड्रायव्हरने ब्रेक लावला अन् लोखंडी प्लेटा अंगावर पडून झाेपलेल्‍या चौघा मजुरांचा मृत्‍यू

परप्रांतीय मजूर कर्नाटकवरून राजस्‍थानकडे जाताना अपघात
Truck driver slams on brakes, four workers die after iron plates fall on them
ट्रक ड्रायव्हरने ब्रेक लावला अन् लोखंडी प्लेटा अंगावर पडून झाेपलेल्‍या चौघा मजुरांचा मृत्‍यूFile Photo
Published on
Updated on

शिऊर : छत्रपती संभाजीनगर

मालेगाव महामार्गावरील शिऊर बंगला जवळील टूनकी येथील बळीराजा ढाब्याजवळ एक भीषण अपघात झाला. यामध्ये मध्य प्रदेशातील चौघांचा मृत्यू झाला. ही घटना (सोमवार) दि.२७ रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली.

शिऊर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच परप्रांतीय मजूर हे कर्नाटकवरून राजस्थानकडे निघाले होते. जड वाहतूक करण्याऱ्या ट्रक क्र.आर.जे ०९ जी.डी ३८५३ ने ते जात होते. त्यातील चार मजूर ट्रकच्या ट्रॉलीमध्ये झोपण्यासाठी गेले होते. अचानक चालकाने ब्रेक दाबल्याने त्या कंटेनर मधील लोखंडी प्लेट पुढे सरकली. त्या लोखंडी प्लेटच्या खाली दबून त्यांचा मृत्यू झाला. दिवाण मानसिंग, विजय कंवरलाल, निर्मल गरासिया, विक्रम कछावा असे मृत झालेल्या मजुरांची नावे असून त्यांचे वय अंदाजे २० ते २४ च्या दरम्यान होते.

सहायक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब, पोलीस उपनिरीक्षक ओगले व सहकारी यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढले. शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शिऊर पोलीस ठाण्यात सूरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news