Crime News : मैत्रिणींसोबत मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे त्रिकुट गजाआड

एमआयडीसी सिडको पोलिसांची कारवाई; ३ दुचाकी जप्त
Crime News
Crime News : मैत्रिणींसोबत मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे त्रिकुट गजाआडfile photo
Published on: 
Updated on: 

Trio arrested for stealing two-wheelers for fun with female friends

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मैत्रिणींसोबत पैसे उडवणे आणि मौजमजा करण्यासाठी चक्क दुचाकींची चोरी करणाऱ्या तीन तरुण चोरट्यांच्या टोळीला एमआयडीसी सिडको पोलिसांनी बेड्या ठोकल्या. एन-१ सिडको परिसरातून चोरीला गेलेल्या एका गाडीचा अवध्या पर्दाफाश केला असून, त्यांच्याकडून चोरीच्या ३ दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक गणपत राहिरे यांनी दिली.

Crime News
Vikhe Patil : उपलब्ध पाणीसाठा ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरेल असे नियोजन करणार

संजय विनोद जाधवर (१९, रा. मदिना गल्ली, पडेगाव), सुशांत मंगेश भालेराव (२१, रा. शहानगर, मसनतपूर, सिंधीवन) आणि युवराज विष्णू चव्हाण (१९, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) अशी या अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर रोजी विशेष पथकाचे अंमलदार पाम हॉटेलजवळ गस्त घालत होते.

यावेळी एका मोपेडवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या या तिन्ही तरुणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना थांबवून विचारपूस केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी ही स्कूटी क्रांती चौक हद्दीतून चोरल्याची कबुली दिली. त्यांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी टाऊन सेंटर भागातून आणखी दोन दुचाकी चोरल्याचे उघड झाले.

Crime News
Illegal Plotting : देवस्थानच्या जमिनीवरील अवैध प्लॉटिंगवर मनपाचा हातोडा

दुचाकीचे हँडल लॉक तोडण्यासाठी ते थेट लाथेचा वापर करायचे. गाडीजवळ उभे तोडत असत. त्यानंतर हँडल मोकळे करून गाडी थोडी पुढे ढकलत न्यायचे आणि वायर डायरेक्ट करून गाडी घेऊन पसार व्हायचे. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गणपत राहिरे, सहायक निरीक्षक भरत पाचोळे, उपनिरीक्षक राहुल विघोत, अंमलदार संतोष सोनवणे, प्रकाश सोनवणे आणि सुशांत भालेराव युवराज चव्हाण पवार, उपायुक्त परिमंडळ २ संजय जाधवर परशुराम सोनुने यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news