Crime News : गांधेली शिवारात तृतीयपंथी पुन्हा सक्रिय

अभद्र वर्तन करणाऱ्या ६ तृतीयपंथींना गुन्हे शाखेत बोलावून सज्जड दम
Crime News
Crime News : गांधेली शिवारात तृतीयपंथी पुन्हा सक्रियfile photo
Published on
Updated on

Transgender individuals active again in the Gandheli area

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बीड बायपासवरील गांधेली फाटा परिसरात महिनाभरापूर्वी वकिलाच्या निघृण खुनानंतर काही दिवस गायब असलेल्या बोगस व तृतीयपंथींच्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

Crime News
Chhatrapati Sambhajinagar | अल्पवयीन लुटारू...चेनस्नॅचिंग..शहरात रात्रीचा थरार! नागरिक दहशतीत

खुनाचे प्रकरण थंड होताच त्यांनी पुन्हा रस्त्याच्या कडेला आपले काळे कारनामे आणि अभद्र कृत्य सुरू केले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी अभद्र वर्तन करणाऱ्या ६ तृतीयपंथीयांना गुन्हे शाखेत बोलावून पोलिसी खाक्या दाखवत अधिकाऱ्यांनी सज्जड दम भरला.

बीड बायपासवर रात्रीच्या अंधारात बोगस तृतीयपंथींचा मेळा भरतो. आंबटशौकिनांना जाळ्यात ओढून झाडाझुडपांत नेणे, लूटमार करणे, ब्लॅकमेल करणे आणि त्यांच्या आडून सराईत गुन्हेगारांनी हल्ले करणे असे प्रकार राजरोस सुरू होते. याच प्रकारातून एका वकिलाची १५ एप्रिलच्या रात्री निघृण हत्या झाली होती.

या गंभीर घटनेनंतर हा बाजार रातोरात गायब झाला होता. मात्र, पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकत त्यांनी पुन्हा बीड बायपासवर बस्तान मांडले होते. लूटमारीच्या नव्या घटना घडण्यापूर्वीच गुन्हे शाखेने या टोळ्यांना चाप लावण्यासाठी कडक पावले उचलली आहे. पोलिस आयुक्तांच्या पास २० पथकांतील अधिकारी आणि अंमलदार मंगळवारी (दि. १२) रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास गस्त घालत होते. यावेळी गांधेली फाटा, बीड बायपास रोड येथे रहदारीच्या मुख्य रस्त्यालगत तीन तृतीयपंथीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अभद्र वर्तन करताना रंगेहाथ आढळून आले. पोलिसांनी तत्काळ त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली होती.

Crime News
Sambhajinagar Crime News : पुंडलिकनगरमध्ये पुन्हा राडा ! निलंबित पोलिसाचा शिवसैनिकावर चाकूहल्ला

गुन्हे शाखेने दाखविला पोलिसी खाक्या

खुनाच्या गंभीर घटनेनंतरही या टोळ्या निर्वावल्याचे पाहून पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी कडक कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी कारवाई करण्यात आलेल्या ३ आणि त्यांच्या इतर साथीदारांसह एकूण ६ तृतीयपंथीयांना गुरुवारी (दि. १४) गुन्हे शाखेत बोलावून घेतले.

यापुढे बीड बायपास किंवा शहरातील कोणत्याही सार्वजनिक व निर्जन स्थळी अभद्र वर्तन करताना आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड दम त्यांना देण्यात आला. सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईत उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे आणि दिनेश बन यांचाही सहभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news