देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

वैजापूर-माळीवाडा रोडवर अपघात
Chhatrapati Sambhajinagar Accident
वैजापूर-माळीवाडा रोडवरील अपघातातील कारfile photo

वाळूज : वैजापूर-माळीवाडा रोडवर जीप आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात देवदर्शन करून जीपने घरी परतणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी आहेत. शनिवार पहाटे वैजापूर रोडवरील फतियाबाद टाकळीजवळ हा अपघात झाला. राजू उचित, पत्नी अलका उचित आणि मुलगा अर्जुन उचित (रा. लॉयननगर, वाळूज), अशी मृतांची नावे आहेत. जखमींवर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news