Papaya Price Falling : पपई बागेवर फिरवला ट्रॅक्टर, भाव कोसळल्याने शेतकरी मेटाकुटीला

व्यापाऱ्याकडू लूट
Papaya Price Falling
Papaya Price Falling : पपई बागेवर फिरवला ट्रॅक्टर, भाव कोसळल्याने शेतकरी मेटाकुटीला File Photo
Published on
Updated on

Tractor rolled on papaya orchard, farmers are fed up with falling prices

कडेठाण, पुढारी वृत्तसेवा : घाम गाळून उभं केलेलं पीक जेव्हा योग्य भावाअभावी नष्ट करावं लागतं, तेव्हा मन हेलावून जातं. अशीच हृदयद्रावक घटना कडेठाण येथे घडली आहे. येथील परिश्रमी शेतकरी गणू भगवानराव वरकड यांनी एक एकर क्षेत्रात पपईची लागवड केली होती. सुरुवातीला बाग सुंदर वाढली, पपई भरपूर लागली; परंतु बाजारभावाच्या घसरणीने आणि निसर्गाच्या उलटलेल्या वाट्याने हे परिश्रम व्यर्थ ठरले.

Papaya Price Falling
Sambhajinagar News : एसटीच्या कागजीपुरा येथील जागेवर स्क्रॅपिंग यार्ड

वरकड यांनी ही पपईची रोपे सोलापूरहून आणली होती. सुरुवातीला शेतीसाठी त्यांनी सुमारे सत्तर हजार रुपये खर्च केला. त्यात गावरान शेणखत, रासायनिक खतांचे डोस, वेळोवेळी फवारण्या, मजुरीचा खर्च यांचा समावेश होता. सर्व काही नियोजनबद्ध पद्धतीने केले, मात्र अतिवृष्टीमुळे बागेवर व्हायरसचा प्रादुर्भाव झाला, त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला.

Papaya Price Falling
Heavy Rains Agriculture Damage : शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात, मदत मिळणार कधी ?

त्यातच व्यापाऱ्यांनी पपईसाठी फक्त दोन रुपये किलो असा अतिशय तुटपुंजा दर सांगितला. दोन रुपयांचा भाव ऐकून शेतकऱ्याचे मन खचले. त्या दरात वाहतूक, मजुरी, पॅकिंग यांचा खर्चही निघत नव्हता. त्यामुळे निराश झालेल्या वरकड यांनी अखेर एक एकर पपई बागेवर रोटावेटर फिरवण्याचा निर्णय घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news