टोयोटाला बिडकीनमध्ये मिळाली ८२७ एकर जागा; ८ हजार रोजगारनिर्मिती

टोयोटाला बिडकीनमध्ये मिळाली ८२७ एकर जागा; ८ हजार रोजगारनिर्मिती
Chhatrapati Sambhajinagar news
टोयोटाला बिडकीनमध्ये मिळाली ८२७ एकर जागाfile photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर: पुढारी वृत्तसेवा : दिल्ली मुंबई इंडस्ट्रयल कॉरिडोरच्या बिडकीन ऑरिकमध्ये टोयोटा किर्लोस्कर मोटर्स प्रा. लि. कंपनीला (टीकेएम) ८२७ एकर जागा मिळाली आहे. त्याबाबत सोमवारी (दि.७) टोयोटाच्या संचालक मंडळाने राज्य सरकारसोबत करार करून जागा ताब्यात घेतली. कंपनी २१ हजार कोटींची गुंतवणूक करणार असून येत्या जानेवारी २०२६ पर्यंत उत्पादन सुरू करणार आहे. दरम्यान, प्रत्यक्षात ८ हजार तर अप्रत्यक्ष १८ हजार रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती एमआयटीएलचे व्यवस्थापकीय संचालक पोपट मिर्लेकर यांनी दिली.

दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोरच्या शेंद्रा-बिडकीन ऑरिकला मागील ८ वर्षांपासून एक अँकर प्रकल्पाची प्रतीक्षा होती. मात्र टोयोटा आणि जेएसडब्ल्यू या दोन हायब्रीड व ग्रीनफिल्ड वाहन कंपन्या मिळाल्याने प्रतीक्षा संपली आहे. यातील टोयोटाने ३१ जुलै २०२४ रोजी राज्य सरकारशी बिडकीन ऑरिकमध्ये गुंतवणुकीबाबत एमओयू केला होता. तर सोमवारी कंपनीने जागा ताब्यात घेतली. राज्य शासनासोबत मुंबईमध्ये जागा खरेदीचा करार झाला. यात कंपनीने शुल्क भरून जागा ताब्यात घेतली आहे.

वर्षाला ४ लाख कार्सचे उत्पादन

टोयोटा किर्लोस्कर मोटर्स प्रा. लि. कंपनी बिडकीनमध्ये २१ हजार कोटींची गुंवणूक करणार आहे. यात २० हजार कोटींच्या गुंतवणुकीतून कंपनी दरवर्षी हायब्रीड आणि इलेक्ट्रिक अशा ४ लाख कारचे उत्पादन करणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागेच्या करारानंतर व्यक्त केला.

Chhatrapati Sambhajinagar news
नाशिककरांसाठी शुभवार्ता : वर्षात 62 कंपन्यांकडून सात हजार कोटींची गुंतवणूक, ‘इतकी’ रोजगारनिर्मिती

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news