Minor Children Missing : विविध भागांतून तीन मुले, मुली बेपत्ता

नातेवाईकांकडून अपहरणांची शंका व्यक्त
Sambhajinagar missing children
Minor Children Missing : विविध भागांतून तीन मुले, मुली बेपत्ताpudhari photo
Published on
Updated on

Three boys and girls have gone missing from different areas

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील विविध भागांतून अल्पवयीन मुले-मुली अचानक बेपत्ता झाल्याच्या घटना वाढीस लागल्या असून, अवघ्या तीन दिवसांत तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत अपहरणाच्या तक्रारी दाखल झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sambhajinagar missing children
Knife Attack : कौटुंबिक वादातून तरुणावर चाकू हल्ला

मुकुंदवाडी जे सेक्टर परिसरात रा-हणारी एक अल्पवयीन मुलगी ६ फेब्रुव-ारी रोजी सकाळी घरातून बाहेर पडली ती परतीलच नाही. फिर्यादी यांच्या पत्नी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या, तर ते आपल्या छोट्या मुलीला शाळेत सहलीकरिता सोडण्यासाठी बाहेर गेले होते. त्यांनी तिच्या मित्र-मैत्रिणी तसेच परिसरात शोध घेतला असता, ती मिळून आली नाही. या प्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अप हरणाचा गुन्हा मुकुंदवाडी पोलिसांनी दाखल केला आहे.

दुसऱ्या घटनेत जवाहरनगर परिसरातील विष्णूनगर येथील अल्पवयीन मुलगी ५ फेब्रुवारी रोजी घरात कोणालाही न सांगता निघून गेली. पालकांनी रेल्वे स्टेशन, बसस्थानक, नातेवाईकांकडे तसेच परिसरात तिचा शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही. अखेर अज्ञात व्यक्तीने फूस लावून मुलीला पळवून नेल्याचा संशय मुलीच्या पलकांनी व्यक्त केल आहे. त्यावरून जवाहरनगर पोलिसांनी अप-हरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

Sambhajinagar missing children
Crime News : गुन्हे शाखेच्या पथकाकडून मॅफेड्रोन जप्त

राहुलनगरातून मुलगा बेपत्ता

राहुलनगर, रेल्वे स्टेशन परिसरातून ३ फेब्रुवारीच्या रात्री एक अल्पवयीन मुलगा घरातून बेपत्ता झाला. रात्री उशिरापासून पहाटेपर्यंतच्या दरम्यान ही घटना घडली. तक्रारदारांनी अज्ञात व्यक्तीने फूस लावून मुलाला पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news