Domestic Gas : घरगुती गॅससाठी हजारो ग्राहक वेटिंगवर

पुरवठ्याची दुप्पट मागणी, बुकिंगसाठी धडपड, एजन्सी चालक चक्रावले
Domestic Gas
Domestic Gas : घरगुती गॅससाठी हजारो ग्राहक वेटिंगवरfile photo
Published on
Updated on

Thousands of customers on the waiting list for domestic gas

राहुल जांगडे

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आखाती देशात भडकलेल्या युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत होऊन शहरातही घरगुती गॅस टंचाई निर्माण झाली आहे. त्यात ऑनलाईन बुकिंग यंत्रणा कोलमडल्याने भीतीपोटी गॅस एजन्सींवर ग्राहकांच्या रांगा लागत आहे. सलग आठवड्याभरापासून हेच चित्र कायम असून, रोजच्या गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याच्या दुप्पट मागणी होऊन हजारो ग्राहक वेटींगवर असल्याने परिस्थिती हाताळताना एजन्सींचालकाच्या नाकीनऊ येत आहे.

इराण-इस्रायल व अमेरिका यांच्यात पेटलेल्या संघर्षामुळे गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. साठेबाजी रोखण्यासाठी कंपन्यांनी बुकिंगचे नियम बदलले आहेत. त्यातच ऑनलाईन बुकिंग बंद झाल्याने ग्राहक पॅनिक होऊन घरगुती गॅसची मागणी वाढली आहे.

नवीन नियमांमुळे बुकिंगनंतर पुरवठ्याचा अवधी वाढल्याने गॅस टंचाईचे चटके थेट स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले आहेत. गॅस मिळत नसल्याने घाबरलेल्या ग्राहकांकडून शहरातील विविध गॅस वितरण एजन्सीजवर सकाळपासूनच गर्दी होत आहे. अनेक ठिकाणी मोठ्या रांगा लागत आहे. जवळपास सर्वच एजन्सींवर रोजच्या सिलिंडर पुरवठ्याच्या दुप्पट-तिप्पट बुकिंग होत आहे. परिणामी घरगुती गॅस सिलिंडरसाठी वेटिंग लिस्ट रोज वाढत असून, आजघडीला प्रत्येक एजन्सींवर हजारो ग्राहक गॅसच्या प्रतीक्षेत आहेत.

साडेतीन हजारांवर वेटिंग एजन्सीवर रोज ५४२ गॅस सिलिंडर येतात. मात्र ग्राहकांकडून रोज गॅस सिलिंडरची बुकिंग एक हजाराहून अधिक होत आहे. त्यामुळे दररोज सुमारे ४०० ते ५०० सिलिंडरचा गॅप वाढत आहे. सात दिवसांत ब्लॅकलॉक (वेटिंग) साडेतीन हजारांवर पोहोचला आहे.
-दीपक व्यास, गॅस एजन्सी मालक, धावनी मोहल्ला
सात हजार ग्राहक गॅसच्या प्रतीक्षेत ग्राहकांच्या मागणीनुसार एजन्सीवर रोज ५०० सिलिंडरचा पुरवठा असतो. गॅस टंचाई नसली तरी ग्राहक पॅनिक झाल्याने मागणी वाढून एक हजाराहून अधिक बुकिंग होत आहे. गॅस बुकिंग केलेले सात हजारांवर ग्राहक वेटिंववर आहेत.
अजय नरवडे, एजन्सी मालक, उल्कानगरी
रोज पाचशेहून अधिक बुकिंग रोज ३४२ घरगुती सिलिंडरचा पुरवठा होत असतो. परंतु सध्याच्या परिस्थिती ग्राहकांकडून मागणी वाढल्याने रोज ५००हून अधिक बुकिंग होत आहे. वेटिंग लिस्ट १ हजाराच्यावर गेली आहे.
-मनोज सोनवणे, व्यवस्थापक, गॅस एजन्सी, औरंगपुरा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news