Theft News : सातारा परिसरात एका रात्रीत ४ घरे फोडली

इन्फ्लुएन्सरच्या घरातून ३ तोळ्यांचे दागिन्यांसह रोख ३५ हजार लंपास
Satara area burglary
Satara area burglarypudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : सातारा परिसरातील भक्तप्रल्हाद सोसायटीत चोरट्यांनी शनिवारी (दि.१) मध्यरात्री तब्बल ४ घरे फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. यात एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तरुणीचे घरही चोरट्यांनी लक्ष्य केले असून, तिच्या घरातील कपाट फोडून ३ तोळ्यांचे दागिने, ३५ हजारांची रोख असा लाखोंचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी करिष्मा शिवलाल जैस्वाल (२७) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या आई यशोदाबाई यांच्यासोबत भक्तप्रल्हाद सोसायटीत भाड्याने राहतात आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून काम करतात. २० जुलै रोजी करिष्मा या एका वेबसिरीजच्या ऑडिशनसाठी पुणे येथे गेल्या होत्या, तर २६ जुलै रोजी आई घराला कुलूप लावून त्यांच्या मूळ गावी टेंभुर्णी येथे गेली होती. त्यामुळे घर बंद होते.

Satara area burglary
Chhatrapati Sambhajinagar tree plantation scam : १२ कोटींचे वृक्षारोपण; झाले कुठे माहिती नाही

शनिवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास करिष्माला तिचे शेजारी गोविंद जाधव आणि दीपक बोटकर यांनी फोन करून तुझ्या घरात चोरी झाली असून, पोलिस आले आहेत, अशी माहिती दिली. करिष्मा यांनी तात्काळ तिचा मित्र सार्थक पावसे याला घरी पाठवून खात्री केली आणि आईलाही गावाहून छत्रपती संभाजीनगरला बोलावून घेतले.

रविवारी (दि.२) सकाळी करिष्मा यांनी घरी येऊन पाहणी केली असता, बेडरूममधील लोखंडी कपाट फोडलेले आढळले. चोरट्यांनी कपाटातील ३५ हजार रुपयांची रोख रक्कम, साडेपाच आणि चार ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, पाच ग्रॅमचे झुंबर, एक तोळ्याचे कानातले टॉप्स व रिंगा (एकूण ४ जोड) असा मुद्देमाल चोरून नेल्याचे निष्पन्न झाले.

चोरट्यांनी केवळ जैस्वाल यांचेच घर नाही तर याच परिसरातील ज्ञानेश्वर सुरेश रेवणवार, शिवकुमार त्रिंबक कापसे आणि ताराचंद लहू साळुंके या तिघांचीही घरे १ ऑगस्टच्या मध्यरात्री फोडल्याचे समोर आले आहे. मात्र सोमवारपर्यंत त्यांनी सातारा पोलिस ठाण्यात चोरीला काय गेले याची माहिती दिलेली नव्हती, असे पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी सांगितले. एकाच रात्रीत ४ घरे फुटल्याने सातारा परिसरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. तपास सहाय्यक निरीक्षक शिवाजी घोरपडे करत आहेत.

Satara area burglary
Jayakwadi Dam : जायकवाडी धरण ८८ टक्के भरले

धुळे-सोलापूर महामार्गाने पलायन

घरफोडी करणारी टोळी धुळे-सोलापूर महामार्गाने आल्याचा संशय आहे. चोरी झालेले ठिकाणी या महामार्गापासून अगदी जवळ आहे. त्यामळे घरफोडी करून याच मार्गाने टोळीने पलायन केले असावे. त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news