Ganesh Visarjan : शहरात ३ हजार पोलिसांचा राहणार बंदोबस्त

गणेश विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी शहर पोलिस सज्ज
Sambhajinagar Ganesh Visarjan
Ganesh Visarjan : शहरात ३ हजार पोलिसांचा राहणार बंदोबस्त File Photo
Published on
Updated on

There will be a police presence of 3,000 in the city.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा गणेश : विसर्जनानिमित्त शहरात भव्य मिरवणुका निघतात. हजार-ोच्या संख्येने गणेशभक्त यात सहभागी होतात. यंदा डीजेचा दणदणाट नसला तरी पारंपरिक ढोल-ताशांच्या मधुर स्वरात लाडक्या बाप्पाला शहरवासीय शनिवारी (दि.६) निरोप देणार आहेत.

Sambhajinagar Ganesh Visarjan
Sambhajinagar News : महापालिकेकडून शहरात २१ ठिकाणांवर विसर्जन व्यवस्था

त्यानुषंगाने शहर पोलिसांनीही सुरक्षेसाठी व गणेश विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या नेतृत्वात ३ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. डीसीपी रत्नाकर नवले, पंकज अतुलकर, प्रशांत स्वामी, शर्मिष्ठा घारगे यांच्यासह सर्व एसीपी, पोलिस निरीक्षकांनी पथसंचलन करून तयारी पूर्ण केलेली आहे.

असा असेल बंदोबस्त

सहायक पोलिस पोलिस उपायुक्त-४, आयुक्त ७, पोलिस निरीक्षक - ३९, एपीआय/पीएसआय-११३, अंमलदार-२१२२, आरपीएफ, एसअ-ारपीएफच्या दोन तुकड्या, दंगा काबू पथकाच्या २ प्लाटून, ५०० होमगार्ड तैनात असतील. याशिवाय वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत १२ स्ट्रॅकिंग फोर्स गस्तीवर राहतील. ६ फोर्स नियंत्रण कक्षात सज्ज राहणार.. तसेच विसर्जन मार्गावर रॅपिड एक्शन फोर्स, एसआरपीएसच्या दोन तुकड्या तैनात राहणार असल्याचे विशेष शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले.

Sambhajinagar Ganesh Visarjan
Ghati Hospital : घाटी प्रसूती विभागात एकाच दिवशी ७८ सुलभ प्रसूती

गणेश विसर्जन मिरवणुकीवर असे असेल लक्ष

▶ गणेश विसर्जनाची १४ ठिकाणे आहेत

▶ शहरात ८०३ सार्वजनिक तर १ लाख ६१ हजार घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन होणार आहे.

▶ शहरातील ७४ संवेदनशील ठिकाणी सशस्त्र जवान

> मिरवणूक मार्गावरील धार्मिक स्थळांवर दक्षता म्हणून आच्छादित करून विशेष बंदोबस्त तैनात राहणार

▶ सर्व मिरवणुकांवर ८ उच्च दर्जाच्या ड्रो-नद्वारे तसेच कमांड कंट्रोल सेंटरच्या कॅमेऱ्यातून नजर ठेवण्यात येणार

» मिरवणूक मार्गावर घातपात तपासणीसाठी बॉम्ब शोधक नाशकची ३ पथके राहणार

▶ शहरातील चेकपोस्टवर वाहनांची तपासणी. डीजेच्या वाहनांना शहरात प्रवेश करण्यापासून रोखणार.

▶ १२३ अंमलदार ध्वनी प्रदूषण यंत्राद्वारे मिरवणुकीतील आवाजाची पातळी तपासणार

▶ महिला सुरक्षा, लहान मुलांसाठी दामिनी पथक तैनात राहणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news