

There is a traffic jam every day at the Phulambri T-junction
फुलंब्री, पुढारी वृत्तसेवा :
शहरातील मुख्य बाजारपेठ टी पॉइंट येथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे, यामुळे वाहनधारक पार वैतागले आहेत येथे नगरपंचायतीच्या एका गाळ्यात पोलिस मदत केंद्र (चौकी) उघडली मात्र वाहतुकीसंदर्भात बदल दिसत नाही. चौकीतील पोलिस कर्मचारी हे चौकीतून बाहेरच येत नाही अशा तक्रारी वाहनधारकांतून होत आहे. त्यांच्याच समोर वाहनांची गर्दी असली तरी समस्या दूर होत असल्याने वाहनधारक वैतागले आहेत.
या टी पॉइंटवर कधीही शिस्त नाही, दिवसभरा वाहतूक कोंडी कायम असते. हॉर्नच्या आवाजाने
परिसरातील नागरिक वैतागून जातात तरीही पोलिस हालचाल करत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यात नगरपंचायतची भिंतच रस्त्यावरच आहे त्यापुढे फळांच्या गाड्या ऐन रस्त्यावर असतात, यामुळे ही वाहतूक कोंडी वाढली आहे. फळांच्या गाड्या बऱ्याच वेळेस हटविल्या मात्र दोन दिवस झाले की पुन्हा या गाड्या रस्त्यावर उभ्या असतात.
अजिंठा वेरूळसाठी दिवसभरात देशी परदेशी पर्यटक या रस्त्यावरून ये जा करतात. असतात. पर्यटकदेखील या कोंडीत सापडतात व डोक्याला हात लावून वाहनात बसलेले असतात. संभाजीनगर-अजिंठा वेरूळ असा हा मध्यबिंदू असलेला येथील टी पॉइंट आहे मात्र याकडे कोणाचेही लक्ष नाही.
पोलीस चौकी नावालाच ।
दीड वर्षांपूर्वी टी पॉइंटवर भर दिवसा चाकूचे वार करून खून झाला होता. तेव्हापासून येथील नगरपंचायतीच्या एका गाळ्यात पोलिस चौकी उघडण्यात आली, मात्र या पोलिस चौकीचा काहीही उपयोग होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिस कर्मचारी हे कोणालाही काहीही बोलत नाही यामुळे येथे जो गोंधळ व्हायचा तो सुरूच आहे तरी यावर पोलिसांनी तत्काळ लक्ष द्यावे अशीच वाहतूक कोंडी बसस्थानकासमोर होते यामुळे बसस्थानकात येण्यास मोठी अडचण होते.