छत्रपती संभाजीनगर : तरुणीला अडवले, आरडाओरड करताच तरूणाने स्वतःचा गळा कापला

तरुणीला अडवले, आरडाओरड करताच तरूणाने स्वतःचा गळा कापला
The young man took out a knife from his pocket and tried to end his life by stabbing himself.
जालना रोडच्या मागील बाजूस एमजीएम ते चिस्तिया चौक रस्त्यावर एका युवकाने स्वतःचा गळा कापून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीला अडवले, आरडाओरड करताच स्वतःचा गळा कापला

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जालना रोडच्या मागील बाजूस एमजीएम ते चिस्तिया चौक रस्त्यावर एका युवकाने स्वतःचा गळा कापून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुजमील आरेफ शेख (२५, रा.चिश्तिया कॉलनी) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याने स्वतःच्या खिशातून चाकू काढत स्वतःवर वार करत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि.6) रात्री अकराच्या सुमारास मुजमील रस्त्याच्या बाजूला उभा होता. यावेळी त्याने एका मुलीला अडवून तिला दुसऱ्या मुलीबाबत माहिती विचारली. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यातून मुलीने आरडाओरड सुरू केल्याने परिसरातील काही नागरिक तिथे दाखल झाले.

The young man took out a knife from his pocket and tried to end his life by stabbing himself.
दक्षिण महाराष्ट्रातील अंडी दराबद्दल मोठी अपडेट

त्यावेळी मुजमिल याने स्वतःच्या खिशातून चाकू काढत गळ्यावर व छातीवर वार करत स्वतःला जखमी केले. त्यावेळी उपस्थित नागरिकांनी त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले. सदर घटनेत तो गंभीर जखमी झाला असून रात्री उशिरा त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील यांनी दिली. दरम्यान, रुग्णालयाच्या आवारात मोठा जमाव जमल्याने एसआरपीएफ खबरदारीचा उपाय म्हणून पाचारण करण्यात आले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news