अरेरे! तरूणाने 'त्‍या' विहिरीत काढले २ दिवस अन् २ रात्री, मोकाट कुत्र्यांच्या पाठलागात...

नातलगांना भेटण्यासाठी आलेल्‍या तरूणावर दुर्देवी प्रसंग
The young man fell into an underground well
तरूणाने 'त्‍या' विहिरीत काढले २ दिवस अन् २ रात्रीPudhari Photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर :

जालना येथून संभाजीनगरच्या पिशोर गावात नातलगाला भेटण्यासाठी आलेल्या तीस वर्षीय तरुणावर चांगलाच प्रसंग ओढावला. गावात येताच त्या तरुणाच्या पाठीमागे मोकाट कुत्रे लागले, दरम्यान त्यांच्यापासून बचाव करत पळत असताना तरुण खोल भूमिगत विहिरीत जाऊन पडला.

या विहिरीत एक दोरी सोडण्यात आली होती. त्‍या दोरीला धरून त्याने जीव वाचवला व तसंच लटकत चक्क दोन दिवस आणि दोन रात्र उपाशी राहून काढल्या. दरम्यान तो मदतीसाठी आरडा ओरड करत मदत मागत राहिला. पण विहीर निर्मनुष्य ठिकाणी असल्याने कुणीही त्याच्या मदतीला आले नाही.

मात्र तिसऱ्या दिवशी मोहोळ शोधण्यासाठी काही जण त्या निर्मनुष्य ठिकाणी आले आणि गावकरी पोलिसांच्या मदतीने त्या तरुणाला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. संदीप घटकवडे असे विहिरीत पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news