फर्दापूर : पुढारी वृत्तसेवा
सोयगाव तालुक्यातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात (रविवार) रात्रभर व आज (सोमवार) पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील वाघूर नदीला मोठा पूर आला आहे. यामुळे अजिंठा लेणीतील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला सप्तकुंड धबधबा कोसळायला सुरुवात झाली आहे.
यामुळे पावसाळी पर्यटन हंगामात अजिंठा लेणी सफरीवर येणाऱ्या पर्यटकांसाठी ही एक विशेष पर्वणीच ठरणार आहे. या धबधब्याचे विहंगम दृष्य पर्यटकांचा अजिंठा लेणी सफरीचा आनंद द्विगुणित करणार आहे.