

The number of voters has increased in both urban and rural areas.
मन्सुर कादरी
सिल्लोड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदार यादीची ०१ जुलै २०२५ अर्हता दिनांक निश्चित केलेली आहे. सिल्लोड नगर परिषद हद्दीत ३१४ तर जिल्हा परिषद पंचायत समिती करिता ७६३ मतदार वाढले असून विधानसभा निवडणूक मतदार यादीच्या तुलनेत मतदारांची वाढ झालेली आहे.
राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका तसेच नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विहित मुदतीत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोग व राज्य शासनाने सुरू केलेली आहे.
मनुष्यबळ व यंत्र सामग्रीच्या कमतरतेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कदाचित दोन किंवा तीन टप्प्यांत होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दोन टप्प्यांत निवडणुका झाल्यास पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची जास्त शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका तसेच नगरपंचायती, महानगरपालिका निवडणुका होण्याचा अंदाज आहे. तर तीन टप्प्यांत घेतल्यास पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद पंचायत समिती, दुसऱ्या टप्प्यात नगर परिषद नगरपंचायत व तिसऱ्या टप्प्यात महानगरपालिका अशा पद्धतीने निवडणुका घेण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद पंचायत समिती, महानगरपालिका, नगर परिषद व नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीच्या प्रमाणे घेण्याचे जवळपास निश्चित केले होते. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरून यामध्ये बदल करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसठी ०१ जुलै २०२५ अर्हता निश्चित करण्यात आली आहे.
या अर्हतानुसार तयार केली जात असलेली मतदार यादी जिल्हा परिषद पंचायत समिती, महानगरपालिका, नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरून वापरण्यात येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी यापूर्वी निवडणूक आयोगाकडून विधानसभा २०२४ मतदार मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली होती. होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आयोगाकडून त्यामध्ये बदल करून एक जुलै अर्हता निश्चित नुसार अद्ययावत मतदार यादी या प्रमाणे मतदार निश्चित करण्यास सांगितलेले आहे.
लतीफ पठाण, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सिल्लोड.
शहरात १४ प्रभागांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या एकूण प्रभागात शहरातील ५४ हजार ८१० मतदारांची सेन्सेस ब्लॉकनुसार विभागणी केली जाईल. सर्व प्रक्रिया अंतिम झाल्यावर १ जुलै २०२५ अर्हता नुसार नोंदणी झालेले मतदार ५४ हजार ८१० मतदार २८ नगरसेवकांची निवडीसाठी मतदान करतील.