Crime News : मजुरीसाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाचे घर पेटवले; मोटारसायकलही जाळली

जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले
Crime News
Crime News : मजुरीसाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाचे घर पेटवले; मोटारसायकलही जाळलीfile photo
Published on: 
Updated on: 

The house of a family who had gone out to work was set on fire; A motorcycle was also burnt

वरठाण, पुढारी वृत्तसेवा कामानिमित्त कुटुंबासह बाहेरगावी मजुरीसाठी गेलेल्या कुटुंबाच्या घराला आणि घरासमोर उभ्या असलेल्या मोटारसायकलला गावातील दोघांनी आग लावल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. ३१) रात्री धापतांडा (ता. सोयगाव) येथे घडली. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले असून, याप्रकरणी बनोटी पोलिस दूरक्षेत्रात शनिवारी उशिरा तक्रार दाखल करण्यात आली.

Crime News
Crime News : चिकलठाणा पोलिसांचा गुन्हेगारांवर 'सर्जिकल स्ट्राईक'

धापतांडा येथील मजूर सुनील देविदास चव्हाण हे कुटुंबासह दोन दिवसांपूर्वी कामानिमित्त सुरत येथे गेले होते. तसेच विष्णू पितांबर चव्हाण हे ऊसतोडणीसाठी गेल्याने त्यांनी आपली दुचाकी घरासमोर उभी केली होती. घराला कुलूप असल्याची संधी साधून गावातील दोघांनी जुन्या वादाचा राग मनात धरून रात्रीच्या सुमारास घराच्या दरवाजाला आणि घरासमोर उभ्या असलेल्या मोटारसायकलला आग लावली.

आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य आणि मोटारसायकल जळून खाक झाली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गरीब मजूर कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, घरातील कपाटात ठेवलेली एक लाख ५० हजार रुपयांची रोकडही आगीत जळून खाक झाली.

घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक गजानन आरेकर यांच्यासह संदीप सुसर, राजू बरडे, नारायण खोडे आणि संजय सिंगल यांनी घटनास्थळी धाव घेतली. छत्रपती संभाजीनगर येथील फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करून तपास सुरू करण्यात आला.

Crime News
Sambhajinagar News : कांदा, लिंबू आणि लसणाचे दर तेजीत..

विष्णू पितांबर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित भास्कर गुलाब राठोड आणि अनिल गुलाब राठोड (दोघे रा. धापतांडा, ता. सोयगाव) यांच्याविरुद्ध सोयगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोयगाव पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.