महापालिकेची पहिलीच सभा ठरणार वादळी

प्रशासकांच्या कामाची चिरफाड, वाइळेसह दोन उपायुक्तांच्या नियुक्तीवर प्रश्न
Chhatrapati Sambhajinagar
Sambhajinagar News : महापालिकेची पहिलीच सभा ठरणार वादळीFile Photo
Published on
Updated on

The first meeting of the Municipal Corporation will be stormy

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा येत्या २७ मार्च रोजी होत आहे. या सभेत प्रशासनाकडून केवळ दोन विकास कार्माचेच विषय मंजुरीस्तव ठेवले आहेत. मात्र, असे असले तरी दहा नगरसेवकांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे, उपायुक्त अंकुश पांढरे, लखीचंद चव्हाण यांच्या नियुक्तीसह नगररचना, शिक्षण विभागातील बदल्या आणि इतर प्रशासकी कामकाजातील मनमानीपणावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे पहिलीच सर्वसाधारण सभा वादळी ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.

महापालिकेच्या निवडणुकीनंतर

महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते आणि विषय समितींच्या सभापतींच्या निवडीनंतर आता पहिलीच सर्वसाधारण सभा येत्या २७ मार्च रोजी होत आहे. तब्बल साडेपाच वर्षांनंतर महापालिकेची सभा होत असल्याने प्रत्येक नगरसेवकांमध्ये उत्सुकता दिसत आहे.

२९ प्रभागांतून ११५ नगरसेवक निवडून आले असून प्रत्येकजण आपापल्या प्रभागातील समस्या आणि अडचणींवर प्रशासनाला धारेवर धरण्याच्या तयारीत आहेत. पहिल्या सभेत एकूण ८ विषय मंजुरीस्तव ठेवले आहेत. त्यातील पहिल्या दोन विषयांपैकी एक महात्मा बसवेश्वर पुतळ्याची उंची वाढविण्याचा अन् दुसरा रस्त्यावरील पॅचवर्कच्या कामासाठी डांबर खरेदीचा विषय आहे. त्याशिवाय रस्त्याच्या नामकरणाचे तीन, पुतळा उभारणीचा एक आणि दोन धार्मिक स्थळांना दर्जा देणाऱ्या विषयाचा समावेश आहे.

नगरसेवकांचे प्रशासनाला सवाल

अफसर खान : यांनी शहरातील पाणीपुरवठ्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. कुठे आठव्या तर कुठे दहाव्या दिवशी पाणीपुरवठा होतो. मात्र काही वसाहतींना चार दिवसांआड पाणी कसे मिळते.

त्र्यंबक तुपे : शहरातील बीओटी आणि प्रशासकांच्या साडेपाच वर्षाच्या काळात महापालिकेच्या मालकीच्या किती जागा भाडेतत्त्वावर किती वर्षांसाठी दिल्या, त्यातून मनपाला किती उत्पन्न मिळते.

वैशाली कोरडे : मोकाट कुत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका काय करते, जालना रोडवर अतिक्रमण हटवण्याची कारवाई करताना काही ठिकाणी मालकी हक्काची घरे दुकाने पाडली. त्यांच्या मोबदल्याचे काय झाले.

फेरोज खान : मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांना किती वर्षांसाठी नियुक्ती दिली. नक्षत्रवाडीतील ग्रुप हाऊसिंग स्कीममधील अनियमितता, मिटमिटा येथील तापडीया कन्स्ट्रक्शनच्या शालेय आरक्षणातील जागेचा मोबदला देताना रोख रकमेऐवजी टीडीआर का दिला नाही. शिक्षकांच्या बदल्यातील अनियमितता,

दया गायकवाड

महापालिकेत सहा उपायुक्तपद मंजूर असून त्यात ३ प्रतिनियुक्तीचे आणि ३ महापालिका आस्थापनेवरील आहे. मात्र, सध्या मनपात ८ उपायुक्त कार्यरत असून अतिरिक्त दोन उपायुक्त कोणाच्या आदेशाने सेवेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news