The expenditure limit for municipal corporation candidates is 11 lakhs
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्री व भरणा करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली आहे. निवडणूक रिं-गणात उतरणाऱ्या उमेदवारांना आयोगाने खर्च मार्यादा निश्चित करुन दिली आहे. त्यानुसार एका उमेदवाराला ११ लाख रुपये खर्च मार्यादा राहणार आहे.
त्यासोबतच चहा-नाश्ता आणि जेवणासह बॅनर, पोस्टर आणि मंडपाचे दरही निश्चित करून दिले आहेत. त्यानुसार मटण प्लेट दोनशेपेक्षा जास्त नसावी, तर चिकन प्लेटचे दर १५० रुपयेपेक्षा जास्त नसावेत, असे दर महापालिकेने निश्चित केले आहे. गेल्या निवडणुकीत ही खर्च मर्यादा ५ लाख रुपये होती.
महापालिकेच्या यापूर्वीच्या निवडणुकीत उमेदवारांनी चहा-नास्ता, जेवणासह इतर खर्चाचा आकडा लपवणे शक्य झाले होते. यंदा प्रत्येक प्रचार सभेचा फोटो, विल व यादीसह अहवाल सादर करावा लागणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी व कशा पद्धतीने ही प्रक्रिया करावी लागेल त्यासाठी निवडणूक अधिकारी प्रशिक्षण शिबिरे घेणार असून, स्वतंत्र ऑडिट टीम गठित केली आहे. हे दरपत्रक शहरातील २९ प्रभागांसाठी लागू आहे. या निर्णयाचा यंदा सर्वच उमेदवारांना चांगलाच फटका बसणार आहे. तब्बल दहा वर्षांनी आणि तेही प्रभाग पद्धतीत निवडणूक असल्याने यंदा खर्च मार्यादा चांगलीच वाढणार आहे.
मनपा निवडणुकीत एका प्रभागात अ, ब, क, ड प्रमाणे चार सदस्य निवडणूक द्यायचे आहेत. त्यामुळे एका मतदाराला ४ उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांना किमान ५० लाखांपर्यंत खर्च करावा लागेल, अशी चर्चा आहे.
एका प्रभागातच एका पक्षाला किमान दीड ते दोन कोटींचा खर्च करावा लागणार आहे. पोस्टर, बॅनर, वाहने, कार्यकर्ते आणि सभांच्या आयोजनासोबत मतदारांना खुश करण्यासाठी पैसे वाटपही होणार आहे. अधिकृत मयदिपेक्षा अनेकपट जास्त खर्च होणार असल्याने पारदर्शकतेवर आणि आयोगाच्या नियंत्रणावर विशेष लक्ष असणार आहे.