छत्रपती संभाजीनगर : छावणी परिसरातील दुर्घटनेतील मृत व्यक्तींना राज्यसरकार कडून मदत मिळवून देणार : मंत्री अतुल सावे

छत्रपती संभाजीनगर : छावणी परिसरातील दुर्घटनेतील मृत व्यक्तींना राज्यसरकार कडून मदत मिळवून देणार : मंत्री अतुल सावे
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : शहारातील छावणी परिसरात आज (दि. ३ बुधवारी) पहाटे ३ वाजता अचानक एका कपड्याच्या दुकानाला आग लागली. या घटनेत एकाच कुटुंबातील सात व्यक्तींचा गुदमरून मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी बुधवारी सकाळी छावणी परिसरातील घटनास्थळी भेट दिली.

यावेळी मंत्री अतुल सावे यांनी झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून मृत व्यक्तीच्या परिवाराला या घटनेतून सावरण्याचे बळ मिळो तसेच राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत केली जाईल. या संदर्भात आपण स्वतः जिल्हाधिकारी यांच्यासोबत दूरध्वनी वरून संपर्क केला असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी प्रसार माध्यमांना दिली. या घटनेत लवकरात लवकर मदत कशी मिळेल याकरिता आपण प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितले. या आगीत 3 महिला, 2 लहान मुले आणि 2 पुरुष यांचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news