

The commissioner's order was completely disregarded
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील सिमेंट रस्ते फोडण्यासाठी ब्रेकरऐ-वजी कटरचा वापर करावा, असे आदेश आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. तसेच कटरचा वापर करणाऱ्या कंत्राटदारालाच कामे देण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. परंतु, असे असतानाही महापालिकेच्या भिंतीलगतच्या रस्ताच एका कंत्राटदाराने कटरऐवजी ब्रेकरने फोडून प्रशासकांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली.
मनपा आयुक्त तथा प्रशासकांनी मंगळवारी महापालिकेच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या सर्वसाध-ारण सभेच्या सभागृहातील यंत्रणेची चाचणी घेण्यासाठी या सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी शहरातील सिमेंट रस्ते फोडण्यासाठी ब्रेकरचा वापर करू नका, त्यासाठी कटर वापरण्यात यावे. कटर मशीन असलेल्या कंत्राटदारालाच कामे द्यावी,
ब्रेकरने रस्ते फोडल्यास त्यांना जबर दंड लावा, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. या आदेशानंतर अधिकाऱ्यांकडून तत्काळ अंमलबजावणी होईल. कंत्राटदार रस्ता फोडून काम करून निघून जातो, फोडलेला रस्ता पूर्ववत केला जात नाही. माती टाकून केलेला खड्ड बुजविला जातो. काही दिवसांत हा खड्डा पुन्हा अवतरतो. त्यामुळे वाहनध- ारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
दंडात्मक कारवाईचे आदेश
महापालिकेच्या टप्पा क्रमांक ३ इमारतीमधून जुन्या इमारतीत इलेक्ट्रिकची केबल टाकण्यासाठी नुकताच तयार केलेल्या काँक्रीट रस्ता फोडण्यात येत असल्याचे कामगारांनी सांगितले. या कामामुळे दोन्ही इमारतींच्या पार्किंग गेटसमोर वाहतूक कोंडी झाली. ब्रेकरचा आवाज दोन्ही इमारतीत घुमत होता, मात्र अधिकाऱ्यांच्या कानापर्यंत हा आवाज काही पोहचला नाही. रस्ता फोडणाऱ्या कंत्राटदाराला जबर दंड लावा, असे आदेश आयुक्तांनी दिलेले आहेत.