हर हर महादेवचा जयघोष आता अमेरिकेत

शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्याचा भव्य प्रयोग
sambhajinagar news
हर हर महादेवचा जयघोष आता अमेरिकेतfile photo
Published on
Updated on

The chant of 'Har Har Mahadev' now in America

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

राजा शिवछत्रपती देवगिरी ते रायगड हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य महानाट्य आता अमेरिकेतील विविध शहरांमधील प्रतिष्ठित रंगमंचांवर सादर होणार असून, हर हर महादेवचा जयघोष जगाच्या कानाकोपऱ्यात घुमणार आहे. सत्तरहून अधिक कलाकारांचा सहभाग असलेल्या या महानाट्याची संकल्पना, दिग्दर्शन आणि सादरीकरणाची संपूर्ण जबाबदारी अमेरिकेत स्थायिक भारतीयांनी समर्थपणे पेलली आहे, हे विशेष मानले जात आहे.

sambhajinagar news
El Mencho | क्रूरकर्म्याचा अंत

या प्रयोगास बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष प्रसाद पानवलकर, सचिव नरेंद्र कल्याणकर यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती लाभणार आहे. या महानाट्याचे कथाकथन अमेरिकेतील इतिहास अभ्यासक सुजित साठे यांचे असून, त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या शैलीमुळे प्रयोग अधिक प्रभावी ठरतो.

दिग्दर्शन किरण राऊत यांनी केले असून, प्रसिद्धीची जबाबदारी अमित पाठक, तांत्रिक बाजू चैतन्य जोशी, तर व्यवस्थापन योगेश एकबोटे यांनी सांभाळले आहे. गायन प्रिया पाडळीकर यांनी केले असून, प्रमुख भूमिकांमध्ये शंकर गायकवाड, अमित जहागीरदार, अमित जोशी, सतीश थोपटे, रश्मी थोपटे, अनुप शहापूरकर, केतकी पाठक, अनिकेत चाळकर आणि आशिष कोथळकर यांचा सहभाग आहे. नृत्य दिग्दर्शन व सादरीकरण शरयू कुलकर्णी, कविता सलामवडे, आशा शेलार, गायत्री हापसे, राजवर्धन देसाई, पूर्वा राजवाडे, रवी खोकराळे, अक्षय मोहगावकर आदी कलाकारांनी साकारले आहे. दरम्यान, या उपक्रमातून होणारा आर्थिक लाभ भारतातील दुर्ग संवर्धन आणि इतिहास जतनासाठी समर्पित केला जाणार आहे.

sambhajinagar news
PM Narendra Modi | भारतातील व्यवसाय संधी साधा; पंतप्रधान मोदी यांचे मलेशियन व्यावसायिकांना आवाहन

१८ एप्रिलला महानाट्याचा पहिला प्रयोग

अमेरिकेच्या पश्चिम भागातील सिलिकन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बे एरिया येथील नामांकित हेरिटेज कॅम्पबेल थिएटरमध्ये १८ एप्रिल रोजी या महानाट्याचा पहिला प्रयोग सादर होणार आहे. महार-राष्ट्र मंडळ बे एरियाचे सचिव अजिंक्य मांढरे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून २ मे रोजी अमेरिकेच्या पूर्व भागातील बोस्टन येथे न्यू इंग्लंड महाराष्ट्र मंडळाच्या वतीने दुसरा प्रयोग होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news