

The boyfriend refused to marry his girlfriend as soon as she became pregnant
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : प्रेमसंबंधात प्रेयसी गर्भवती राहिल्यानंतर प्रियकराने तिच्याशी लग्न करण्यास नकार देत टाळाटाळ केली. हा प्रकार शनिवारी (दि.१७) मुकुंदवाडी भागात उघडकीस आला आहे.
स्वप्नील सुधाकर दांडगे (२२, रा. इच्छामणी हॉटेलसमोर, मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी १९ वर्षीय पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी स्वप्नीलने तिला लग्नाचे आमिष दाख वून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. जा नेवारी २०२५ पासून दोघांचे प्रेमसंबंध जुळले. नेहमी दोघे फोनवर बोलत होते.
या दरम्यान स्वप्नील तिला भेटायला मुकुंदवाडी येथील मैदानावर रात्रीच्या वेळी बोलावत असे. पीडितेसोबत वेळोवेळी त्याने शारीरिक संबंध ठेवले. तीन महिन्यांपूर्वी पीडिता गर्भवती राहिली असता तिने त्याला फोन करून गर्भवती असल्याचे सांगताच त्याने घाबरू नको मी तुला गोळ्या आणून देतो, असे म्हणून त्याने दिलेल्या गोळ्या पीडितेने तीन दिवस घेतल्या.
मात्र तिला रक्तस्राव सुरू झाल्याने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी तिला तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. पीडितेने स्वप्नीलला वारंवार फोन केला, मात्र त्याने घेतला नाही नंतर फोन बंद करून ठेवला. अखेर पीडितेने मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत शनिवारी तक्रार दिली. त्यावरून स्वप्नील विरुद्ध अॅट्रॉसिटीसह लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास एसीपी मनीष कल्याणकर करत आहेत.