Sambhajinagar Crime News : प्लॉटिंगच्या तक्रारीचा राग; सुपारी देऊन बिल्डरद्वारे वृद्धावर जीवघेणा हल्ला

बिल्डरसह त्याच्या पेट्रोल पंपावरील मॅनेजर, कर्मचाऱ्याला बेड्या; हर्सल भागातील घटना
sambhajinagar news
Sambhajinagar News : प्लॉटिंगच्या तक्रारीचा राग; सुपारी देऊन बिल्डरद्वारे वृद्धावर जीवघेणा हल्लाfile photo
Published on
Updated on

The anger of the plotting complaint; builder launches a life-threatening attack on an elderly man

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा प्लॉटिंगमध्ये नागरिकांची फसवणूक केल्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वारंवार तक्रारी करणाऱ्या एका ६५ वर्षीय निवृत्त कर्मचाऱ्याचा काटा काढण्यासाठी खुद्द बिल्डरनेच 'सुपारी' देऊन जीवघेणा हल्ला केला. बिल्डरने स्वतःच्या पेट्रोल पंपावरील मॅनेजर आणि कर्मचाऱ्याला हाताशी धरून हा हल्ला घडवून आणला. हसूल परिसरातील अमरनाथ हौसिंग सोसायटीजवळ गुरुवारी (दि.२) सायंकाळी हा प्रकार घडला. हर्सल पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत 'मास्टरमाईंड' बिल्डरसह तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सुरेंद्र कोलते (बिल्डर), भगवान सखाराम आदाने (५०, मॅनेजर) आणि मुख्य हल्लेखोर शुभम कारभारी कापडणे (२८, कर्मचारी, तिघे रा. हसूल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार फरार आहे. या जीवघेण्या हल्ल्यात दत्तात्रय पांडुरंग ठोंबरे (६५, रा. अमरनाथ हौसिंग सोसायटी) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक स्वाती केदार यांनी दिली. बिल्डर सुरेंद्र कोलते याने १५ वर्षांपूर्वी हसूल भागात प्लॉटिंग पाडली होती. यात २० फुटांऐवजी केवळ १० फुटांचाच रस्ता सोडल्याचा फिर्यादी ठोंबरे यांचा आरोप आहे.

बिल्डरने नागरिकांची फसवणूक केल्याचे सांगत यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारींचा सपाटा लावला होता. या सततच्या तक्रारींमुळे वैतागलेल्या कोलतेने ठोंबरे यांना धडा शिकविण्याचा कट रचला. त्याने आपला मॅनेजर भगवान आदाने याला सांगितले. आदानेने त्यांच्याच पंपावरील कर्मचारी शुभम कापडणेला हल्ल्यासाठी तयार केले. गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ठोंबरे सिडको एसीपी कार्यालयातील काम आटोपून दुचाकीवरून घरी परतत होते.

त्यावेळी एकाच दुचाकीवरून आलेल्या शुभम व त्याच्या साथीदाराने पाठलाग सुरू केला. पाळत असल्याचे लक्षात येताच ठोंबरे यांनी गाडीचा वेग वाढवला, मात्र रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी धीमी झाली. याच संधीचा फायदा घेत हल्लेखोरांनी गाडी आडवी लावली. शुभमने खाली उतरून ठोंबरे यांच्या पाठीत चाकू खुपसला. ते रक्तबंबाळ होताच हल्लेखोर पसार झाले. घटनास्थळी डीसीपी रत्नाकर नवले, एसीपी मनोज पगारे यांनी धाव घेतली होती.

मास्क पडला अन् बिंग फुटले

झटापटीत आरोपी शुभमच्या तोंडावरील मास्क खाली पडला आणि तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली. बिल्डर कोलते, आदानेला अटक केल्यानंतर फरार शुभमला हसूल पोलिसांनी थेट कल्याण गाठून बेड्या ठोकल्या. याप्रकरणी हर्सल पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि कटाचा गुन्हा दाखल झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news