वैजापुरात दोन गटात तणाव; शहरात जमावबंदीचे आदेश

पोलिसांकडून शांतता राखण्याचे आवाहन
Tension between two factions in Vaijapur Strict police cordon in the city
वैजापुरात दोन गटात तणाव: शहरात जमाबंदीचे आदेशPudhari Photo
Published on
Updated on

वैजापूर : पुढारी वृत्तसेवा

गुरवारी रात्री व्हायरल व्हिडिओमुळे वैजापूर शहरामध्ये दोन गट आमने-सामने आले होते. यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर वैजापूर शहरामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

याबद्दल अधिक माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील एका धर्मगुरूंनी काल (गुरूवार) एका कार्यक्रमात एक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा निषेध म्हणून वैजापूर शहरात मोठा जमाव जमला. त्यांच्याविरोधात अचानक मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्‍या पार्श्वभूमीवर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनकडून घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. जमावाला शांत करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

तसेच रात्रीच प्रशासनाकडून शहरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते. आज (शुक्रवार) सकाळी शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांकडून नागरिकांना कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news