

Teachers are distressed due to continuous election duty
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : गंगापूर नगरपरिषद आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकांसाठी सलगपणे निवडणूक ड्युटी लावण्यात आलेल्या तालुक्यातील शिक्षकांना आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कामातून वगळण्यात यावे, तसेच दिव्यांग, गरोदर महिला व दुर्धर आजार असलेल्या कर्मचाऱ्यांना सूट द्यावी, अशी मागणी शिक्षक सेनेच्या वतीने तहसीलदार श्रीमती तीपेरे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.
नुकतीच गंगापूर नगरपरिषद निवडणूक पार पडली असून, येत्या १५ तारखेला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक होत आहे. या दोन्ही निवडणुकांसाठी गंगापूर तालुक्यातील अनेक शिक्षकांना निवडणूक अधिकारी व कर्मचारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
यावेळी शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष सुनील जाधव, जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र साळवे, जिल्हा उपाध्यक्ष जे. के. राऊत, दादा पाचपुते, मच्छिद्र बडोगे, सत्तार शेख, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख राजू गायकवाड, जिल्हा सहसंपर्कप्रमुख दत्ता घोगरे, तालुकाध्यक्ष अंकुश रावते, उपाध्यक्ष हंसराज काळे, संपर्कप्रमुख सुधाकर लोखंडे, कोषाध्यक्ष आजिनाथ खिल्लारे, सरचिटणीस प्रदीप शिंदे, सुनील मंडलिक, बाबासाहेब रासकर, किशोर घोरपडे, राजू कर्डीले, सुनीता ढवळे, दादासाहेब गावंडे, सिद्धेश्वर स्वामी आदी उपस्थित होते.
शिक्षण सेवेवर परिणाम
सलग निवडणूक प्रक्रिया व वारंवार ड्युटीमुळे शिक्षण प्रक्रिया खंडित होत असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. तसेच काही मोजक्या शिक्षकांनाच वारंवार निवडणूक कामावर नियुक्त केले जात असल्याने अन्याय होत असल्याची भावना शिक्षकांमध्ये आहे.