Chhatrapati Sambhajinagar Crime : निलंबित पोलिस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजेला जामीन

वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे मृत्यू प्रकरण
Chhatrapati Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar Crimepudhari photo
Published on
Updated on

खुलताबाद: वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणात तपासादरम्यान दोषी आढळलेल्या आणि खुलताबाद पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या निलंबित पोलिस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजेला बुधवारी (दि.१७) खुलताबाद न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने प्रथम त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर सुनावणी घेत जामीन मंजूर केला. त्यामुळे नागरगोजे याची जामिनावर सुटका करण्यात आली.

वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणाने राज्यात खळबळ उडवून दिली आहे. सुरुवातीच्या तपासात पोलिसांनी सात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि या प्रकरणातील सातही संशयित आरोपींना अटक करण्यात आली. न्यायालयीन प्रक्रियेनंतर या सातही आरोपींना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Sindhudurg Crime : लग्न करू देत नसल्याने युवतीचा खून

दरम्यान, या प्रकरणाचा अधिक सखोल तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी विविध पुरावे, साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक माहिती तसेच घटनाक्रमाचा बारकाईने अभ्यास केला. या तपासादरम्यान प्रकरणात काही नवीन धागेदोरे समोर आले. त्यातून तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे आणि पोलिस कर्मचारी वाल्मीक बनगेची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली.

तपास अधिकाऱ्यांनी उपलब्ध पुरावे आणि नोंदींच्या आधारे दोघांवरही संशय व्यक्त करत पुढील चौकशी सुरू केली. मंगळवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी नागरगोजेला ताब्यात घेतले. चौकशीसाठी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास खुलताबाद पोलिस ठाण्यात आणण्यात आले. रात्री उशिरापर्यंत चौकशीची प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर बुधवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास नागरगोजेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी अटक केली.

अटकेनंतर बुधवारी दुपारी सुमारे अडीच वाजता खुलताबाद पोलिसांनी नागरगोजेला येथील न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी पक्षाने न्यायालयासमोर तपासाची माहिती मांडली, तर बचाव पक्षाच्या वकिलांनी नागरगोजे याच्या वतीने बाजू मांडत जामीन देण्याची मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने प्रथम न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर बचाव पक्षाकडून जामिनासाठी स्वतंत्र अर्ज दाखल करण्यात आला.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Sangli crime: सांगलीत दगडाने ठेचून वृद्धाचा खून

अर्जावरील सुनावणीनंतर न्यायालयाने काही अटी व शर्तीसह नागरगोजेला जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या आदेशानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याची सुटका करण्यात आली. दरम्यान, शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यूबाबत सत्य समोर आणण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news