हतनूर येथील वारकरी आश्रमातील विद्यार्थिनीवर बलात्कार; नराधम बाबाला अटक

Chh. Sambhajinagar sexual assault | आणखी एका विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Chh. Sambhajinagar sexual assault
हतनूर (ता. कन्नड) येथील वारकरी आश्रमातील विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. File Photo
Published on
Updated on

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : राज्यात बदलापूर येथील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असताना कन्नड तालुक्यातील हतनूर येथील माऊली वारकरी कन्या आश्रमाच्या संस्था चालकाने शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर दुसऱ्या एका विद्यार्थिनीचा विनयभंग करून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात नराधाम बाबा विरुद्ध आज (दि,२४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वारकरी आश्रमात १५ मुली शिक्षण घेतात

याबाबत अधिक माहिती अशी की, हतनूर येथे जैतापूर रोडवर दादा महाराज अकोलकर उर्फ बाबा यांचा माऊली वारकरी कन्या शिक्षण आश्रम आहे. येथे वेगवेगळ्या ठिकाणच्या १५ मुली शालेय शिक्षण घेत वारकरी शिक्षण घेतात. जैतापूर येतील इयत्ता ७ वीत शिक्षण घेणारी १३ वर्षीय विद्यार्थिनी आश्रमात वारकरी शिक्षण घेते. या विद्यार्थिनीच्या आईने बाबाविरूद्ध फिर्याद दिली आहे.

झोपण्याआधी बाबा मुलींकडून हातपाय दाबून घेत होता

जेवण झाल्यानंतर झोपण्याआधी बाबा मुलींकडून आपले हातपाय दाबून घेत होता. दररोज रात्री जेवण झाल्यावर झोपण्याआधी पीडितेकडून बाबा हातपाय दाबून घेत होता. दरम्यान, पीडित विद्यार्थिनी जेवण करुन मंगळवारी (दि. २०) रात्री दहाच्या सुमारास झोपली होती. रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास बाबा पीडितेजवळ गेले. त्यांनी तिला झोपेतून उठवून पाय दाबण्यासाठी आपल्या शेडमध्ये घेऊन गेले. पलंगावर बसून पाय दाबत असताना बाबाने बळजबरी करून पीडितेवर बलात्कार केला. त्यानंतर जाऊन झोपून रहा, कोणाला काही सांगू नको, नाहीतर मी तुला शिकवणार नाही, अशी धमकी दिली.

झाेपेतून उठवून बलात्कार 

त्यानंतर पीडितेच्या बाजूलाच झोपलेल्या दुसऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीला पाय दाबण्यासाठी ते घेऊन गेले. तिचा विनयभंग करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत असताना बाहेर कुणीतरी आल्याचा आवाज आल्याने बाबा उठून बाहेर गेल्याने ती तेथून पळून आली. या प्रकाराची माहिती पीडितेने शाळेतील शिक्षिकेला सांगितली. त्यानंतर त्याच्या आईवडिलांना शाळेत बोलावून घेण्यात आले.

उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. बाबावर गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर आज (दि. २४) सकाळी बाबाविरूद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.

Chh. Sambhajinagar sexual assault
धाराशिव, छत्रपती संभाजीनगर नाव कायम राहणार!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news