

शिऊर : तालुक्यातील पेंडेफळ, टुणकी, सावखेड व परिसरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने टुणकी ग्रामस्थांनी सिंचन विभागाच्या उपअभियंता यांना निवेदन दिले. पेंडेफळ येथील पाझर तलावातून पाण्याचा अवैध उपसा बंद करून कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी यात करण्यात आली आहे.
पेंडेफळ येथील पाझर तलावात अद्यापपर्यंत तीस टक्के पाणीसाठा उपल्ब्ध आहे. या तलावातून पाण्याचा अवैध उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. टुणकि, पेंडेफळ , सावखेडा या गावांना शासकीय पाणीपुरवठा योजना अंतर्गत पिण्यासाठी व जनावरांसाठी पाणी पुरवले जाते.
सद्यपरिस्थितीतील पाझर तलावात पाणीसाठा आहे. या परिसरातील काही जणांनी अवैध विद्युत पंप बसवून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा सुरू केला आहे. यातून ग्रामपंचायतीच्या विहिरीचा पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे टुणकी, पेंडेफळ , सावखेडा येथे पाणीटंचाई आतापासून जाणवत आहे. पेंड फळ पाझर तलावातील अवैध विद्युत पंप तात्काळ काढण्यात यावा व पाणीसाठा राखीव ठेवावा नसता आमचे आमरण उपोषण पुढे चालूच राहील एवढे करून देखील आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही जलसमाधी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा टुणकितील किशोर निकम, ज्ञानेश्वर गोरे, बाळू मोरे, साहेबराव नागे, असे वीस पोषण कर्त्यांनी व ग्रामस्थांनी इशारा दिला दिला आहे.