Rolling Blocks : रोलिंग ब्लॉकमुळे काही गाड्या उशिराने धावणार

दक्षिण मध्य रेल्वे हैदराबाद विभागा मधील नोव्हेंबर-डिसेंबर २०२५ दरम्यान रोलिंग ब्लॉक प्रोग्राम घेण्यात आला आहे.
rolling blocks  Railway Train
रोलिंग ब्लॉकमुळे काही गाड्या उशिराने धावणार Pudhari File Photo
Published on
Updated on

Some trains will run late due to rolling blocks

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दक्षिण मध्य रेल्वे हैदराबाद विभागा मधील नोव्हेंबर-डिसेंबर २०२५ दरम्यान रोलिंग ब्लॉक प्रोग्राम घेण्यात आला आहे. यामुळे नांदेड विभागात धावणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द अंशतः रद्द समय परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे.

rolling blocks  Railway Train
‌‘वंदे मातरम्‌‍‌’ ला सर्वप्रथम मास्टर फुलंब्रीकरांनी लावली चाल

या ब्लॉकमुळे दौंड-निजामाबाद डेमू १२,१३,१४, १६, १७, १९, २०, २१, २३, २४, २६,२७, २८, ३०नोव्हेंबर तसेच १, ३,४,५,७,८, डिसेंबर दरम्यान मुदखेड ते निजामाबाद दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. तसेच गुंटूर-छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस १६,२३, ३० नोव्हेंबर व ७ डिसेंबर रोजी ९० मिनिटे उशिराने धावेल.

rolling blocks  Railway Train
Sambhajinagar News : पाडापाडीला कडाडून विरोध; मनपाचे पथक फिरले माघारी

नांदेड-मेडचल डेमू २१ आणि २८ १८० मिनिटे उशिराने धावेल. कोठी-काचीगुडा एक्सप्रेस ५ आणि १२ डिसेंबर रोजी ७५ मिनिटे उशिराने धावेल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-लिंगमपल्ली देवगिरी एक्सप्रेस ५ आणि १२ डिसेंबर रोजी ६० मिनिटे उशिराने धावेल. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news