पाणीपुरवठा मोटारीत साप आढळला

बुधवारी दिवसभर वीजपुरवठ्यात अडचण असल्याने पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकला नव्हता.
Snake found in water supply pump.
पाणीपुरवठा मोटारीत साप आढळलाfile photo
Published on
Updated on

Snake found in water supply pump.

सोयगाव, पुढारी वृत्तसेवा : सोयगाव येथील पाणीपुरवठा योजनेच्या मोटारीत बिघाड झाल्याने नगर पंचायत कर्मचारी दुरुस्तीसाठी धरण परिसरात गेले असता अनपेक्षित घटना घडली. मोटार बाहेर काढल्यानंतर त्यामध्ये साप आढळून आला. मात्र, कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत कोणतीही घाईगडबड न करता सापाला सुरक्षितपणे बाहेर काढले आणि त्याला जिवंत अवस्थेत पाण्यात सोडून दिले.

Snake found in water supply pump.
Jalna News | स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सेवेचा सन्मान व्हावा : डागोर

दरम्यान, बुधवारी दिवसभर वीजपुरवठ्यात अडचण असल्याने पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकला नव्हता. गुरुवारी मोटार सुरू करण्यासाठी कर्मचारी गेले असता ही घटना घडली. अशा परिस्थितीतही कर्मचारी जीव धोक्यात घालून आपली जबाबदारी पार पाडत असल्याचे दिसून आले. यावेळी नगरपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी सुरेश महाले व बाकी कर्मचारी हजर होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news