Sambhajinagar News : शिवाजीनगर भुयारी मार्गात धूरच धूर, तासभर वाहतूक ठप्प

कचरा संकलन वाहनाच्या इंजिनमध्ये बिघाड : अग्निशमन दलाच्या वाहनालाही कमानींचा अडथळा
Sambhajinagar News : शिवाजीनगर भुयारी मार्गात धूरच धूर, तासभर वाहतूक ठप्प
Published on
Updated on

Smoke fills Shivajinagar underpass; traffic stalled for an hour

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या वाहनाच्या इंजिनमध्ये शिवाजीनगर भुयारी मार्गात बिघाड झाल्याने गुरुवारी (दि.२५) सायंकाळी या मार्गात धुराचे मोठे लोट पसरले. काही मिनिटांतच संपूर्ण भुयारी मार्ग धुराने व्यापला. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे वाहन वेळेत बाहेर काढण्यात आल्याने संभाव्य दुर्घटना टळली. या सर्व प्रकारामुळे सुमारे तासभर या मार्गातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

Sambhajinagar News : शिवाजीनगर भुयारी मार्गात धूरच धूर, तासभर वाहतूक ठप्प
Chhatrapati Sambhajinagar News : अतिक्रमणधारकांवर महापालिका मेहरबान ?

देवळाईकडून शहराच्या दिशेने येणारे महापालिकेचे कचरा संकलन वाहन गुरुवारी सायंकाळी भुयारी मार्गात पोहोचताच त्याच्या इंजिनमधून अचानक धूर निघू लागला. सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा प्रकार काही क्षणांतच गंभीर बनला. धुराचे प्रमाण वाढत गेल्याने संपूर्ण मार्ग धुराच्या लोटांनी भरून गेला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्यापूर्वीच स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत बंद पडलेले वाहन ढकलून भुयारी मार्गाबाहेर काढले. दरम्यान, वाहतूक थांबल्याने भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस आणि संबंधित यंत्रणांना मोठी कसरत करावी लागली. जवळपास तासाभरानंतर वाहतूक पूर्ववत झाली. कमानी ठरल्या अडथळा शिवाजीनगर भुयारी मार्गात अवजड वाहनांना प्रवेश रोखण्यासाठी दोन्ही बाजूंना लोखंडी कमानी उभारण्यात आल्या आहेत. आपत्कालीन मदतीसाठी आलेले अग्निशमन दलाचे वाहन मार्गात प्रवेश करण्यात यशस्वी झाले. मात्र दुसऱ्या बाजूने बाहेर पडताना कमानीमुळे अडचण निर्माण झाली. काही काळ वाहन तेथेच अडकून राहिल्याने वाहतुकीचा खोळंबा वाढला.

Sambhajinagar News : शिवाजीनगर भुयारी मार्गात धूरच धूर, तासभर वाहतूक ठप्प
Sambhajinagar News : शिवाजीनगर भुयारी मार्गातील संपेना अडचणी

आपत्कालीन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

धुराच्या घटनेपेक्षा अग्रिशमन वाहनालाच मार्गातून बाहेर पडताना आलेली अडचण अधिक चर्चेचा विषय ठरली.

शिवाजीनगर भुयारी मार्ग पुन्हा चर्चेत

वाहतूक कोंडी, पावसाळ्यातील अडचणी किंवा तांत्रिक कारणांमुळे शिवाजीनगर भुयारी मार्ग वारंवार चर्चेत राहिला आहे. मात्र गुरुवारी कचरा वाहनातून निघालेल्या धुरामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यानंतर अग्निशमन वाहनास आलेला अडथळा यामुळे हा भुयारी मार्ग पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news