Municipal Council Election : सिल्लोड न. प. निवडणूक घोषित होताच निवडणुकीला आली रंगत

थेट जनतेतून नगराध्यक्ष : १४ प्रभागांतील ५४ हजार ८०८ मतदार सज्ज
Municipal Council Election
Municipal Council Election : सिल्लोड न. प. निवडणूक घोषित होताच निवडणुकीला आली रंगत File Photo
Published on
Updated on

Siloed NP Election declared

प्रा. मन्सुर कादरी

सिल्लोड : सिल्लोड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच तापू लागली आहे. शहरातील एकूण १४ प्रभागांमधून २८ नगरसेवक आणि थेट जनतेतून निवडला जाणारा नगराध्यक्ष अशा या निवडणुकीसाठी ५४ हजार ८०८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा नुकतीच झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू झालेली आहे. लवकरच प्रचाराच्या सभा बैठकांचे सत्र अपेक्षित असतानाच शहरात चौकाचौकांत चर्चाचा जोर चांगलाच रंगत आहे.

Municipal Council Election
Municipal Election : कोणता वॉर्ड कुणाचा ? आज होणार फैसला

शहरातील पुरुष मतदार २८ हजार २७६, तर महिला मतदार २६ हजार ५२९ आहेत. प्रभाग क्रमांक ९ हा सर्वाधिक ५ हजार २२५ मतदारांसह आघाडीवर असून, प्रभाग क्रमांक १३ मध्ये सर्वात कमी २ हजार ३९४ मतदार आहेत. विशेष म्हणजे प्रभाग - क्रमांक ०८ मध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त असून, उर्वरित सर्व प्रभागांत पुरुष मतदारांचे प्रमाण जास्त आहे. प्रत्येक मतदाराला तीन मतदानाचा अधिकार एक नगराध्यक्षासाठी आणि दोन नगरसेवकांसाठी अशा तिन्ही मतदानाच्या संधी मिळणार आहेत. शहरात एकूण १४ प्रभागांमधून प्रत्येकी दोन नगरसेवक निवडले जाणार असल्याने २८ नगरसेवकांची निवड होणार आहे.

निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासूनच राजकीय चर्चा रंगत होत्या, परंतु आता अधिकृतपणे निवडणुकीची घोषणा झाली असून, सिल्लोडच्या राजकीय वातावरणात निवडणुका जाहीर झाल्याने तापमान अधिकच वाढले आहे. शिवसेना (शिंदे गट) तर्फे माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार यांनी माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांची नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी घोषणा केली आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये त्यांच्या संपर्क कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले असून, या कार्यक्रमातून आ. अब्दुल सत्तार आणि पदाधिकाऱ्यांकडून विरोधकांवर जोरदार टीका सुरू आहे.

Municipal Council Election
बोगस कॉल सेंटर प्रकरणातील १०६ आरोपींचा जामीन फेटाळला

विकासकामांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास जिंकण्याची मोहीम सुरू आहे. दरम्यान, भाजपाने आमदार अब्दुल सत्तार या त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामकाज व कार्यपद्धतीवर तसेच नगरपरिषदेच्या कामकाजावर आणि सत्ताधाऱ्यांविरोधात बोट ठेवत निवेदनवाजी, धरणे आंदोलन आणि उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. शहरातील प्रवेशद्वार व कमानींवरील वादाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापले असून, हिंदू मुस्लिम एकता समितीने काही प्रवेशद्वारांना विरोध करून शहरात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा निषेध नोंदवला आहे. त्यामुळे विरोधकांच्या आंतरिक कलहाचाही अप्रत्यक्षपणे चव्हाट्यावर आला आहे.

नगराध्यक्षपदाबाबत चौकाचौकात चर्चा

शहरात विधानसभा मतदारसंघात आमदार रोजदारांची एक छत्री नेतृत्व असल्याने मित्र निर्णय घेणे त्यांना फार अवघड होत नाही. शिवसेनेने निवडणुकीची औपचारिक घोषणा होण्याआधीच शहरातील बहुतांश परिसरात प्रत्यक्ष फिरून लोकांशी संपर्क करण्याचा एक राऊंड त्यांनी पूर्ण केला आहे. विरोधक मात्र अजूनही उमेदवारी निश्चितीच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे शहरातील जनतेत चर्चा रंगू लागली आहे. या वेळेस नगराध्यक्षपदावर कोणाचा झेंडा फडकेल? फ्फनिवडणुकीच्या तोंडावर सिल्लोड शहरांमध्ये राजकीय चर्चा जोरात पेटल्या असून रंगत चढत चर्चाना जोरात उधाण आले आहे. जनतेतून निवडला जाणारा नगराध्यक्ष कोण? हेच आता चौकाचौकात, कठड्यांवर खंबगदार चर्चा रंगू लागल्या आहे.

प्रभागनिहाय मतदार संख्या

प्रभाग क्रमांक एक, ३ हजार ८६३, प्रभाग क्रमांक दोन ३ हजार २४१, प्रभाग क्रमांक तीन ४ हजार ६४०, प्रभाग क्रमांक पाच ३ हजार ४५१, प्रभाग क्रमांक सहा ४ हजार ५३३, प्रभाग क्रमांक सात २ हजार ८८६, प्रभाग क्रमांक आठ ५ हजार ०९, प्रभाग क्रमांक नऊ ५ हजार २२५, प्रभाग क्रमांक दहा ३ हजार ७८१, प्रभाग क्रमांक अकरा ४ हजार ४५४, प्रभाग क्रमांक बारा - ५ हजार १५, प्रभाग क्रमांक तेरा ३ हजार ३९४ व प्रभाग क्रमांक चौदा ३ हजार १८ याप्रमाणे मतदार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news