छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आगमन

पळशीत ग्रामस्थांमध्ये अमाप उत्साह, फटाक्यांची आतषबाजी
Sillod news
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आगमनfile photo
Published on
Updated on

sillod Statue of Chhatrapati Shivaji Maharaj

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा :

तालुक्यातील पळशी येथे श्री प्रभू रामचंद्र यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आगमन करण्यात आले. शिवस्मारक समिती, जय श्रीराम मित्रमंडळ, शिवस्वराज्य ग्रुप, ग्रामस्थांच्या अमाप उत्साहात व मंत्रांच्या उच्चारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा स्थानापन्न करण्यात आला.

Sillod news
Chhatrapati Shivaji Maharaj statue Gevrai : वाद चिघळला; पुतळा हलविण्याच्या प्रस्तावावर शिवप्रेमी आक्रमक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आगमनाची ग्रामस्थांकडून आठवडाभरापासून तयारी सुरू होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा स्मारक व परिसर विद्युत रोषणाई व फुलांच्या माळांनी झगमगून निघाला.

गावातील गल्लींमध्ये रांगोळी, तर घरोघरी गुढी उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आगमन झाले. सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजीनगर येथून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा फुलांच्या माळांनी सजवलेल्या गाडीतून वाजतगाजत पळशीकडे मार्गस्थ झाला महामार्गावर ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले.

Sillod news
Hingoli news | वसईत विनापरवाना शिवरायांचा पुतळा बसवल्याने तणाव; ५ ग्रामस्थांवर गुन्हा दाखल

केहऱ्हाळा फाट्यापासून पळशीपर्यंत तीन तास मिरवणूक चालली. यात दुचाकी, चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. केहऱ्हाळा फाट्यापासून पळशीपर्यंत रस्त्यावरील बांधलेले भगवे झेंडे लक्ष वेधून घेत होते. मिरवणुकीत पुरुष, तरुण शाळकरी विद्यार्थ्यांसह महिलांमध्ये अमाप उत्साह पाहायला मिळाला. मिरवणुकीदरम्यान ग्रामीण पोलिसांनी चोख बंदोबस्त बजावला.

भगव्या टोप्या, फटाक्यांची आतषबाजी

मिरवणुकीदरम्यान तरुणांची वेशभूषा, डोक्यात भगव्या टोप्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे गावात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. प्रभू रामचंद्र, जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने तरुणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी ग्रामस्थांनी पुष्पवर्षाव केला. श्री प्रभू रामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news