

पिशोर : सिल्लोड वन विभागाचे गणेशपुर बिट मध्ये खडकी शिवारातील गट क्रमांक १०१मधील गंगाधर नाना जाधव यांच्या मालकीच्या शेतात शनिवारी रात्री ते रविवारी सकाळी या दरम्यान बिबट्याने हरणाचा फडशा पाडला .
शेतकरी गंगाधर जाधव सकाळी शेतात गेले असता चिंचाच्या झाडाखाली हरणाचे शव मृत अवस्थेत पडलेले दिसले. शेतकऱ्याने याबाबतची माहिती वन विभाग सिल्लोड गणेशपुर बिटचे वनरक्षक अनिल इंगळे यांना माहिती दिली. अनिल इंगळे यांनी सहकारी सोबत घेऊन हरणाचा पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तय्यब आत्तार व कर्मचारी संतोष वाघ यांनी हरणाचे शवविच्छेदन केले. पशुवैद्यकीय अधिकारी व वनरक्षक यांनी सांगितले की बिबट्याने हरणाचा शिकार केली. हरणाचे वय जवळपास १८ महिन्याचे असल्याचे सांगितले.
उष्णतेची तीव्रता वाढली हिंसक प्राणी व जंगली प्राणी हे अन्न पाण्याच्या शोधात शेत वस्तीकडे वळले. शनिवारी रात्रीला बिबट्याने हरणाची शिकार केल्याने. शेतकरी वर्गात दहशत पसरली. सहाय्यक वनसंरक्षक भामरे साहेब सिल्लोड, यशपाल दिलपाक वनपरिक्षेत्र अधिकारी सिल्लोड प्रा. यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल इंगळे वनरक्षक गणेशपुर , कल्याण खोकड वनरक्षक हिवरा, वनमजूर अशपाक शेख , यांनी हरणाचा पंचा समक्ष अंत्यविधी केला.