Sillod theft gold jewellery : पर्समधील साडे पाच तोळ्यांचे दागिने लंपास

सिल्लोड शहरातील सराफा मार्केटमधील भरदिवसाची घटना
crime news
crime newsPudhari
Published on
Updated on

सिल्लोड : एका महिलेच्या पर्समधून भरदिवसा चोरट्याने ५ तोळे ६ ग्रॅम सोन्याचे दागिने लांबवले. ही घटना रविवारी (दि. ३) दुपारी शहरातील सराफा मार्केटमधील गजानन ड्रेसेस दुकानात घडली. या प्रकरणी सोमवारी (दि. ४) शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादी महिला पुष्पा पंडित खाकरे (४०, रा. चिंचपूर, ता. सिल्लोड) रविवारी आठवडी बाज-ाराला आलेली होती. या दरम्यान सराफा मार्केटमधील गजानन ड्रेसेस दुकानात कपडे खरेदीसाठी गेल्या असता चोरट्याने त्यांच्या पर्सची चेन उघडून सोन्याचे नेकलेस, कानातील वेल, सोन्याच्या मण्यांची पोत, सोन्याची बाळी असे ५ तोळे ६ ग्रॅम सोन्याचे दागिने व २७ हजार रोख असा एकूण जवळपास १ लाख २१ हजार (आजची किंमत ८ लाख ५० हजार) रुपयांचा मुद्देमाल लांबवला. एवढे सर्व झाले तरी त्यांना याचा थांगपत्ता लागला नाही. दुकानात पर्स उघडून तपासल्यावर महिलेला धक्का बसला.

crime news
Chhatrapati Sambhajinagar | अल्पवयीन लुटारू...चेनस्नॅचिंग..शहरात रात्रीचा थरार! नागरिक दहशतीत

फिर्यादी महिलेने सोमवारी सायंकाळी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक साळवे करीत आहे. दरम्यान माहिती मिळताच शहर पोलिसांनी धाव घेत सराफा मार्केटमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आठवडी बाजारात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहण्याचे आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

दुसरी घटना

आठवडाभरात महिलेचे सोन्याचे दागिने लांबवण्याची ही दुसरी घटना आहे. मागच्या मंगळवारी सिल्लोड बसस्थानकावर एका वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्या घटनेचा तपास सुरू असतानाच पुन्हा सराफा बाजारात अशाच प्रकारे पर्समधील दागिने चोरीस गेल्याने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

crime news
Chhatrapati Sambhajinagar | अल्पवयीन लुटारू...चेनस्नॅचिंग..शहरात रात्रीचा थरार! नागरिक दहशतीत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news