

Siddharth Udyan A team will go to inspect lions, bears, and foxes
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा कर्नाटकातील शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयाला वाघ हवे आहेत. त्याबदल्यात ते सिद्धार्थ उद्यानला सिंह, अस्वल आणि कोल्ह्याची जोडी देणार आहेत. या प्रक्रियेपूर्वी प्राण्यांची पाहणी केली जात असून त्यासाठी नुकतेच शिवमोग्गाचे अधिकारी शहरात येऊन गेले. आता १८ ऑगस्टला महापालिकेचे अधिकारी कर्नाटकला जाणार असून या पाहणीनंतर ऑगस्टअखेर प्राण्यांच्या देवाणघेवाणाची प्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालय आणि कर्नाटकच्या शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयामध्ये प्राण्यांच्या देवाण-घेवाणची प्रक्रिया केली जात आहे. यासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने या दोन्ही प्राणिसंग्रहालयांना परवानगी दिली आहे. त्यानुसार सध्या दोन्ही प्राणिसंग्रहालयांकडून प्रक्रिया केली जात आहे.
याअंतर्गत सोमवारी (दि. ११) कर्नाटकच्या शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांचे पथक सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात वाघांची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांना पाहताच क्षणी सिद्धार्थ उद्यानातील पिवळ्या पट्ट्यांचा बेंगॉल टायगर आणि पांढरा वाघ आवडले. जे तिन्ही वाघ कर्नाटकला नेले जाणार आहे.
ते सदृढ असल्याने शेर हट्टेकट्टे असल्याचे कौतुक देखील पथकातील अधिकाऱ्यांनी केले होते. आता १८, १९ ऑगस्टला महापालिकेचे पथक कर्नाटकच्या शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयात जाणार आहे. तेथील सिंह, अस्वल आणि कोल्ह्यांची जोडी पाहणार आहेत.
महापालिकेच्या पथकला हे प्राणि आवडल्यानंतर ऑगस्टअखेरपर्यंत या प्राण्यांची देव-ाणघेवाणची प्रक्रिया केली जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. त्यासंदर्भात आज (दि. १४) शिवमोग्गाच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. दरम्यान, मनपा उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या नेतृत्वाखाली प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी अधिकारी शेख शाहेद, संजय नंदन यांच्यासह कर्मचारी १८ ऑगस्ट रोजी जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.