Paithan crime news | धारदार शस्त्राने अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलाचा खून...; पैठण शहरात खळबळ

रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात व शासकीय रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती
Paithan crime news | धारदार शस्त्राने अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलाचा खून...; पैठण शहरात खळबळ
Published on
Updated on

पैठण : पैठण शहरात एका अल्पवयीन मुलाचा भर रस्त्यात खून करण्यात आला. आरोपीने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल देविदास अहिरे (वय : १७ वर्ष रा. इंदिरानगर पैठण) हा अल्पवयीन मुलगा तहसील रोडवरील बदक चौकातील एका दवाखान्यासमोरील चौकामध्ये उभा असताना एका अल्पवयीन मुलाने त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. आरोपीने अमोलच्या छातीवर वार केल्याने तो गंभीर जखमी होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने अमोलला उपचारासाठी पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

Paithan crime news | धारदार शस्त्राने अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलाचा खून...; पैठण शहरात खळबळ
Nanded Burglary | नायगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; शिवगंगा सोसायटीतील दोन घरे फोडून दागिने, रोकड लंपास

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी तपास सुरू करून अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलास ताब्यात घेतले आहे. घटना रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घडल्याने ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यातून सुरू होती. या घटनेची माहिती मिळतात उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील पोलीस ठाण्यात उपस्थित राहून घटनेच्या तपासाविषयी सूचना पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांना दिल्या आहे‌.

Paithan crime news | धारदार शस्त्राने अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलाचा खून...; पैठण शहरात खळबळ
Yavatmal Crime : यवतमाळ हादरले! महागावमध्ये मध्यरात्री घरफोडी; २४ लाखांचा मुद्देमाल लंपास, परिसरात खळबळ

अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलाचा खून झाल्याच्या या घटनेमुळे पैठण शहरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात व शासकीय रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव गोमारे हे करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news