Chatrapati Sambhajinagar
शिवना टाकळी प्रकल्प १०० टक्के भरलाPudhari Photo

शिवना टाकळी प्रकल्प १०० टक्के भरला; शेतकऱ्यांची चिंता मिटली

नदी काठच्या गावांना सतर्क रहण्याचा इशारा
Published on

हतनूर, पुढारी वृत्‍तसेवा : कन्नड तालुक्यातील हतनूर परिसरातील शिवना टाकळी प्रकल्प १०० टक्क्यांनी भरला आहे. शनिवारी (दि.१९) शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या वाजेदरम्यान मुसळधार पावसामुळे शिवना नदी तुडुंब भरून वाहू लागला आहे. यंदा सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या पावसाने तालुक्यातील धरणे तुडूंब भरली आहेत. त्यामुळे परिसरातील शेतक-यांची पाण्याची चिंता मिटली आहे.

Chatrapati Sambhajinagar
शिवना टाकळी मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो

शिवना टाकळी प्रकल्पचा पूर्ण संचय पाणी पातळी ५६१.८० द.घ.मी इतका पाणी साठ्याची क्षमता असलेल्या  प्रकल्पांमध्ये आतापर्यंत ५५१.८० द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा झाला आहे. यापैकी आजचा उपयुक्त पाणीसाठा .८५१ (द.ल.घ.मी) म्हणजे १०० टक्के एवढा भरले आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्‍याने सर्व धरणे काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतक-यांची चिंता मिटली आहे.रब्बीसाठी लाभदायी यंदा पाणीसाठा उपलब्ध असल्याने आगामी रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.नदी काठच्या गावांनी सतर्क रहावे. कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग क्रमांक १ छत्रपती संभाजीनगर शिवना टाकळी मध्यम प्रकल्प यांनी इशारा दिला आहे.

Chatrapati Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर : टापरगाव शिवना नदी पात्रात बेपत्ता तरुणाचा मृतदेह; कन्नड तालुक्यातील घटना

 शिवना टाकळी मध्यम प्रकल्प

  • १) जोत्याची पाणी पातळी = ५५१.८०मी.

  • २) पूर्ण संचय पाणी पातळी = ५६१.८०द.ल.घ.मी.

  • ३) प्रकल्पीय पूर्ण संचय क्षमता     (द.ल.घ.मी)=३ ९.३६६

  • ४) प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा  (द.ल.घ.मी) = ३६.४९९

  • ५) आजची पाणी पातळी = ५६१.८० मी

  • ६) आजची जल क्षमता  ( द.ल.घ.मी ) = ३९.३६६

  • ७) आजचा उपयुक्त पाणीसाठा (द.ल.घ.मी)  = ३६.४९९

  • ८) आजची टक्केवारी = १०० % 

  • ९) सांडवा एकुण विसर्ग = ( ७६८ ) 

  • १०) गेट क्रमांक १ (१० सें मी ३८४ क्युसेस )

  • ११) गेट क्रमांक ५(१०सें मी ३८४क्युसेस.) 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news