Shashikant Shinde | शेतकऱ्यांवरील अन्याय हे सरकारचे पाप: शशिकांत शिंदे

Chhatrapati Sambhajinagar News | भोकरदन येथे शेतकरी आक्रोश मोर्चासाठी रवाना होण्यापूर्वी शिंदे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद
Shashikant Shinde
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेPudhari Photo
Published on
Updated on

Shashikant Shinde on farmers issues

छत्रपती संभाजीनगर : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची गरज असून निर्णय घेण्यात सरकार विलंब करत आहे. मराठवाड्यात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या आत्महत्या नसून खून आहेत. हे सरकारचे पाप असल्याची टीका सोमवारी (दि.६) शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली. भोकरदन येथे शेतकरी आक्रोश मोर्चासाठी रवाना होण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी शिंदे म्हणाले की, शिवसेना ठाकरे गटाकडून शेतकऱ्यांवरील प्रश्नावर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे आमच्या पक्षाकडून येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले नाही. दरम्यान अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. ऑगस्टपासून महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. अजूनही काही ठिकाणी पंचनामे सुरू आहेत, मात्र मदत जाहीर करण्यात सरकारकडून विलंब होत आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मदतीसाठी प्रस्ताव पाठवा असे म्हटले आहे. म्हणजेच अजून महाराष्ट्राकडून प्रस्ताव दिल्लीला गेलेला नाही. शेतकऱ्यांना आत्ता तातडीने मदत मिळणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

Shashikant Shinde
Chhatrapati Sambhajinagar highway potholes: छत्रपती संभाजीनगर महामार्ग खड्ड्यांत, धुळीत व्यापाऱ्यांचे शटर डाऊन!

तसेच ऑनलाइन पंचनाम्याच्या सूचना आहेत. मात्र अनेक भागात नेटवर्कच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकारने पाच हजारांची मदत जाहीर केली. ती तोकडी असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तर शेतकऱ्यांकडून १५ रुपये आकारण्यापेक्षा कारखान्यांकडूनच ती रक्कम घ्यावी, शेतकऱ्यांवर अधिक आर्थिक भार टाकणे योग्य नाही असेही शिंदे यावेळी म्हणाले. तसेच साखर दर आणि वीज बिलाबाबत बोलताना त्यांनी राज्यातील सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

ठाकरे बंधूंच्या निर्णयानंतर भूमिका

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात ते म्हणाले की, आघाडीतील पक्षांशी संवाद साधून निर्णय घेतला जाईल. तसेच ठाकरे बंधूंचा निर्णय झाल्यावर आम्ही पुढील भूमिका जाहीर करू, असेही ते यावेळी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news