Crime News : शोरूम मॅनेजरचा फ्लॅट फोडून सात तोळे सोने लंपास

उस्मानपुरा : पोलिसांत गुन्हा दाखल
crime news
crime newsFile Photo
Published on
Updated on

Seven Tolas of Gold Stolen After Breaking into Showroom Manager's Flat

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शोरूमच्या मॅनेजरचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी सुमारे ७ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास केला. ही घटना २ ते ५ मे दरम्यान उस्मानपुरा भागातील अपार्टमेंटमध्ये घडली. प्रत्यय फिर्यादी कमलकांत गोपाळराव देशमुख (५९, रा. फ्लॅट नं. ६, प्रत्यय अपार्टमेंट, पीरबाजार दर्गा रोड, उस्मानपुरा) यांच्या तक्रारीनुसार, ते रघुवीर मोटारमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.

शनिवारी (दि.२) सकाळी १० वाजेच्या सुमारास देशमुख यांची पत्नी माधुरी या घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून भाग्यनगर येथे त्यांच्या बहिणीकडे राहण्यासाठी गेल्या होत्या. मंगळवारी (दि.५) सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांचे शेजारी राजेश्वर तिपसेटवार यांनी देशमुख यांच्या पत्नीला फोन करून त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले असल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच पत्नीने तातडीने घरी धाव घेतली.

हा ऐवज गेला चोरीला

३० ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस, १० ग्रॅमची सोनसाखळी, २५ ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, ७ ग्रॅमचे मंगळसूत्र, १ ग्रॅमचा सोन्याचा वेडा यासह चांदीचे करंडे, ग्लास, फुलपात्र, समई, बॅट्या, पैंजण, साखळी, मंगळागौर जोडवे, देवाचा तांब्या, केळीचे पान अशा चांदीच्या वस्तू आणि चार हजाराची रोकड असा लाखोंचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार विष्णू हगवणे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news