Manja News : मांजा विक्रेत्यांसह वापरणाऱ्यांवर गंभीर गुन्हे नोंदविणार : आयुक्त

सर्व पोलिस ठाणेनिहाय पतंग विक्रेत्यांच्या बैठका
मांजा विक्रेत्यांसह वापरणाऱ्यांवर गंभीर गुन्हे नोंदविणार : आयुक्त
मांजा विक्रेत्यांसह वापरणाऱ्यांवर गंभीर गुन्हे नोंदविणार : आयुक्तFile Photo
Published on
Updated on

Serious crimes will be registered against those who sell and use Manja: Commissioner

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा दुचाकीने वडिलांसोबत निघालेल्या ३ वषीय चिमुकल्याचा मांजाने गळा चिरल्याची घटना सेंट्रल नाका परिसरात गुरुवारी घडली होती. हा प्रकार शनिवारी समोर येताच पोलिस र यंत्रणा अलर्ट झाली आहे. पोलिस न आयुक्त प्रवीण पवार यांनी ड बीएनएसच्या कलम १६३ अंतर्गत - तात्काळ प्रभावान्वये मांजावर पूर्णपणे न बंदी घातली आहे. आदेशाचे उल्लंघन . करून नायलॉन मांजा विक्री अथवा बाळगणाऱ्यांवर थेट कलम ११० नुसार सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न केल्याच्या गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी रविवारी (दि.७) दिली. दरम्यान, रविवारी (दि.७) शहर पोलिसांनी सर्व १७ ठाण्यांमध्ये पतंग विक्रेत्यांची बैठक घेऊन कारवाईचा इशारा दिला.

मांजा विक्रेत्यांसह वापरणाऱ्यांवर गंभीर गुन्हे नोंदविणार : आयुक्त
Prakash Abitkar : करमाड ग्रामीण रुग्णालयाची आरोग्यमंत्र्यांकडून झाडाझडती

अधिक माहितीनुसार, नाताळ व मकर संक्रांतीच्या काळात मोठ्या प्रमाणावर पतंग उत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा चायनीज नॉयलॉन मांजा वापरण्यावर अथवा विक्री करण्यावर शासनाने बंदी घातली आहे, असे असतानाही शहरात खुलेआम नायलॉन मांजाची विक्री होताना दिसते. दरवर्षी मांजामुळे नागरिक, पक्षी गंभीर जखमी होण्याच्या घटना घडतात. मात्र मांजा शहरात येतो कसा? साठेबाज, डीलर कोण? त्यांच्यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही. नागरिकांच्या आणि पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी मांजा बंदीचा निर्णय घेण्यात आला असून, अंमलबजावणीसाठी सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

तर पालकांवर गुन्हे दाखल करणार

पतंग उडविण्यासाठी नागरिकानी जीवघेणा नायलॉन मांजा वापरू नये. या मांजामुळे कोणालाही इजा झाली तर संबंधित विक्रेता आणि मांजा वापरणारा दोघांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. मोठ्याप्रमाणात अल्पवयीन मुलेही पतंग उडविताना दिसतात. त्यांच्याकडे मांजा आढळून आल्यास त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला.

मांजा विक्रेत्यांसह वापरणाऱ्यांवर गंभीर गुन्हे नोंदविणार : आयुक्त
Municipal Election : भाजपात उमेदवारीसाठी इच्छुकांमध्येच मोठी स्पर्धा

मांजा गळ्यात अडकून दुचाकीस्वार पडला

रोशनगेट भागात रविवारी एका दुचाकीस्वाराच्या गळ्यात मांजा अडकल्याने तो पडून जखमी झाला. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. जुन्या शहरात मोठ्याप्रमाणात मांजाचा वापर होत असल्याचे यापूर्वीही समोर आले होते.

सिडको ठाण्यात गुन्हा दाखल

तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मांजामुळे गळा चिरल्याची घटना गुरुवारी सेंट्रल नाका, एमजीएम हॉस्पिटलजवळ घडली होती. मुलाचे वडील संजीव बंडू जाधव (३५, ओमसाईनगर, हर्सल) यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीने प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या धाग्याने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असतानाही पतंग उडवण्यासाठी वापर केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news