तेरा कोटींच्या अपहार प्रकरणात सत्यभामा बांगर यांना अटक; ४१ जणांवर गुन्हा दाखल

तेरा कोटींच्या अपहार प्रकरणात सत्यभामा बांगर यांना अटक
Chhatrapati Sambhajinagar news
तेरा कोटींच्या अपहार प्रकरणात सत्यभामा बांगर यांना अटक; ४१ जणांवर गुन्हा दाखल File Photo
Published on
Updated on

पाटोदा, पुढारी वृत्तसेवा जिल्हा विशेष लेखा परिक्षक यांनी केलेल्या लेखापरिक्षणात रामकृष्ण बांगर हे महात्मा फुले अर्बन बँक लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष असून त्यांची पत्नी सत्यभामा बांगर या पाटोदा तालुका दूध संघाच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन आहेत. त्यांनी चेअरमन, संचालक, पदाधिकाऱ्यांसोबत संगनमत करून १३ कोटी २१ लाख ६० हजार २५ रुपयांचा अपहार व गैरव्यवहार केलेला आहे. तसेच १४ संस्थेचे कोणतेही कागदपत्र न घेता, मागणी अर्ज न घेता, कोणतेही तारण न घेता बनावट कागदपत्र तयार करुन ते खरे असल्याचे भासवत त्यांच्या नावे कर्ज दाखवून ही रकम स्वतः उचलून गैरव्यवहार केलेला आहे. या प्रकरणी ४१ जणांवर पाटोदा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाटोदा पोलिस ठाण्यात सहकारी संस्था बीड येथील जिल्हा विशेष लेखा परिक्षक वर्ग-१ बाळासाहेब उत्तमराव भोसले यांच्या फिर्यादीवरुन रामकृष्ण मारोती बांगर, सत्यभामा रामकृष्ण बांगर यांच्यासह संदिप जगन्नाथ सानप, बाळू मच्छिंद्र पवार, भाऊसाहेब बाळासाहेब सोनसळे, तुकाराम रामा बावणे, कार्यारंभ भगवान बाबासाहेब शिंदे, श्रीरंग उत्तमराव सानप, श्रावण श्रीरंग बांगर, संजय उत्तमराव सगळे, संभाजी विठ्ठलराव मसकर, भगवान साधू पाखरे, भगवान बाजीराव सोनवणे, राजेंद्र कारभारी गवळी, नवनाथ भगवान नागरगोजे, पांडूरंग निवृत्ती मस्के, रुक्मिणी सुदाम बांगर, रफिक महोम्मद पठाण, सिताबाई अरुण जावळे, बाबासाहेब भिमराव राख, रणजीत नारायण चौरे, सुरेश दत्तात्रय पुराणिक, प्रदिप दत्तात्रय कुलकर्णी, भीमराव बाजीराव सानप, दिनकर सिताराम बांगर, शामराव यशवंत कंठाळे (मयत), विष्णू विलास थोरवे, महादेव श्रीपती बांगर, राजाभाऊ नामदेव बावणे, बाळासाहेब शामराव बांगर, लक्ष्मण श्रीहरी शिंदे अशी नावे आहेत.

नवनाथ भगवान नागरगोजे, बाबासाहेब भगवान नागरगोजे, हनुमंत रंगनाथ भोसले, प्रभाकर प्रभात गित्ते, प्रदिप बाबुराव गिरे, रविंद्र निवृत्ती उगले, जनार्धन मारोती कटाळे, गुलानभाई मेंगडे, रामचंद्र बाजीराव रांजवण, संजय भिमराव सानप अशा ४१ जणांवर कलम गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच सत्यभामा बांगर यांना अटक करण्यात आली. परंतु त्यांची प्रकृती बिघडल्याने पाटोदा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना बीडला रेफर केले होते. या ठिकाणी त्यांची तपासणी करण्यात आली असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Chhatrapati Sambhajinagar news
हिंगोली : प्राचार्यांना मारहाण प्रकरण : आमदार संतोष बांगर यांच्यासह ४० जणांवर गुन्हा दाखल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news