Sambhajinagar News : बीएलओ ड्यूटीवरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरपंचाकडून गोंधळ

जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आरडाओरड; सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल
Sambhajinagar News
Sambhajinagar News : बीएलओ ड्यूटीवरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरपंचाकडून गोंधळfile photo
Published on
Updated on

Sarpanch creates ruckus in front of Collector's office over BLO duty

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमासाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) म्हणून नियुक्त केल्याने शाळांमधील अध्यापनावर परिणाम होत असल्याचा आरोप करत फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी बुधवारी (दि.८) जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घातला. काही शाळांतील ५० टक्क्यांहून अधिक शिक्षक बीएलओच्या कामात गुंतले असून, विद्यार्थ्यांना शिकवायचे कुणी? असा सवाल उपस्थित करत त्यांनी शिक्षकांना या कामातून मुक्त करण्याची मागणी केली.

Sambhajinagar News
Illegal Sand Excavation : वाळूचोरीच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करा

मागणी मान्य न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सध्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहीम सुरू आहे. या मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप साबळे यांनी केला.

या पार्श्वभूमीवर त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत जिल्हाधिकारी विनय गौडा यांना भेटण्याचा आग्रह धरला. यावेळी त्यांनी एकेरी भाषेत बोलत आरडाओरड केल्याने कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. गोंधळाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला.

Sambhajinagar News
School News : आज शाळा गजबजणार, पुष्पगुच्छाने स्वागत

साबळे यांनी कार्यालयाच्या प्रवेश-द्वारावरच ठिय्या आंदोलन सुरू करत आत्मदहनाचा इशारा दिला. पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी आक्रमक भूमिका कायम ठेवली. दरम्यान, फुलंब्रीच्या तहसीलदार योगिता खटावकर घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी साबळे यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अरेरावीची भाषा वापरल्याचे सूत्रांनी सांगितले. सिटी चौक पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

अर्धा दिवस शाळा, अर्धा दिवस बीएलओचे काम

या घटनेबाबत फुलंब्रीच्या तहसीलदार योगिता खटावकर म्हणाल्या, शिक्षकांनी अर्धा दिवस शाळेचे काम आणि अर्धा दिवस बीएलओची जबाबदारी पार पाडावी, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. आज घडलेला प्रकार अनपेक्षित होता. या संदर्भात सरपंच साबळे यांनी यापूर्वी कोणतीही चर्चा केली नव्हती. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news