Sanjana Jadhav Accident | रावसाहेब दानवे यांच्या मुलीच्या गाडीला अपघात

धुळे-सोलापूर महामार्गावर रांजणगाव फाट्यावरील घटना
Sanjana Jadhav Accident
रावसाहेब दानवे यांच्या मुलीच्या गाडीला अपघातfile photo
Published on
Updated on

कन्नड : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात झाला. धुळे-सोलापूर महामार्गावरील चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव फाट्यावर सोमवारी (दि. ३०) सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात संजना जाधव यांच्यासह चालक व कार्यकर्ते थोडक्यात बचावले.

संजना जाधव या बाजार समितीचे उपसभापती जयेश बोरसे, माजी सरपंच ज्ञानेश्वर निकम, आदित्य गर्जे यांच्यासह तालुक्यातील बनोटी सर्कल मधील वरठाण येथे जात होत्या. रांजणगाव फाट्यावर समोरुन आलेल्या पिकअप (एम.एच.४२ बी.एफ.०६१३ ) ने चालकाच्या बाजूला जोराची धडक दिली. दरम्यान, २६ सप्टेंबर रोजी माजी आमदार नितीन पाटील यांच्या गाडीचा छत्रपती संभाजीनगरकडे येत असताना वेरूळजवळ आपघात झाला होता. यात एक म्हैस ठार झाली होती. एका पाठोपाठ कन्नड विधानसभेसाठी इच्छुक आसलेल्या उमेदवारांच्या गाडीचा आपघात झाल्याने इच्छुकांनो जरा सावकाश अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news