

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या वतीने शहरात प्रतिबंधीत प्लास्ट्रिक कॅरिबॅगवर कारवाई करण्यात येत आहे. कॅरिबॅगमुक्त शहर मोहीम राबवून प्रशासनाने शेकडो सुमारे चार ते पाच ट्रक भरून कॅरिबॅगसाठा जप्त केला आहे. असे असतानाही मोंढा परिसरातील एका बेकरीत प्रतिबंधीत प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर सुरू होता. त्याविरोधात माजी सैनिकांच्या नागरी मित्र पथकाने कारवाई करीत कॅरिबॅग साठा जप्त केला. तसेच २५ हजार रुपयांचा दंड आकारला.
शहरात मागील चार महिन्यांपासून प्रतिबंधीत प्लास्टिक कॅरिबॅगविरोधात महापालिकेच्या वतीने धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमुळे शहरातील भाजीमंडईसह विविध भागातील हॉकर्सने कॅरिबॅग ठेवणे बंद केले आहे. मात्र, अजूनही शहरातील काही दुकानांमध्ये कॅरिबॅगचा साठा उपलब्ध असून त्याचा वापरही होत आहे. या वापरावर महापालिकेच्या माजी सैनिकांच्या नागरी मित्र पथकाचे लक्ष कायम आहे.
जूना मोंढा परिसरातील एका बेकरीत प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर होत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरुन धाड मारल्यानंतर मोठ्याप्रमाणात प्लास्टिकचा साठा अडळून आला. दोन महिन्यापूर्वी देखील याच बेकरीतून प्लास्टिकचा साठा अढळून आला होता. त्यावेळी देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी देखील पथकाने २५ हजार रुपयांचा दंड आकारला तसेच कॅरिबॅग जप्त केल्या.