Paithan Woman Hunger Strike | रस्ता रद्द करण्यासाठी वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिक महिलेचे उपोषण

पैठण तालुक्यातील आनंदपूर शिवारातील शेतीतून रस्ता देण्यास विरोध; नकाशाप्रमाणे अथवा सामाईक बांधावरून रस्ता देण्याची मागणी
Paithan Freedom Fighter Hunger Strike
मुक्ताबाई निवारे यांनी पैठण तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहेPudhari
Published on
Updated on

Paithan Freedom Fighter Hunger Strike

पैठण : पैठण तालुक्यातील आनंदपूर शिवारातील शेतीतून रहदारीसाठी देण्यात आलेला रस्ता आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिक महिला मुक्ताबाई आप्पासाहेब निवारे यांनी पैठण तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. मंगळवारी (दि. २८) सकाळपासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली.

आनंदपूर शिवारातील गट क्रमांक ११८ मधील आपल्या शेतातून प्रशासनाने पूर्वसूचना न देता रहदारीसाठी रस्ता उपलब्ध करून दिल्याचा आरोप मुक्ताबाई निवारे यांनी केला आहे. सदर आदेश रद्द करण्यात यावा, यासाठी त्यांनी यापूर्वी तहसील प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडून या मागणीची दखल घेण्यात आली नसल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी सांगितले.

Paithan Freedom Fighter Hunger Strike
Paithan News : भुसार धान्याची विक्री ओपन लिलावातून

आपल्या शेतजमिनीतून रस्ता देण्याऐवजी संबंधितांना नकाशाप्रमाणे अथवा सामाईक बांधावरून रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवारे यांनी केली आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपीलही दाखल करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिक महिलेने आपल्या मागणीसाठी उपोषण सुरू केल्याने प्रशासन या प्रकरणी कोणती भूमिका घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news