Sambhajinagar News : खून का बदला खून पोस्ट टाकणाऱ्या तरुणाची हत्या

रोहित म्हस्केच्या खुनानंतर आठच दिवसांत पुन्हा गँगवॉरचा भडका; कुख्यात दत्ता रोकडेसह तिघांना बेड्या, मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरील थरार
Sambhajinagar News
Sambhajinagar News : खून का बदला खून पोस्ट टाकणाऱ्या तरुणाची हत्याfile photo
Published on
Updated on

Sambhajinagar News: Youth who posted "Blood for Blood" killed

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

आठ दिवसांपूर्वी खून झालेल्या मित्राचा मिस यू रोहित, खून का बदला खून, असे इन्स्टाग्रामला पोस्ट टाकणाऱ्या तरुणाची तीन कुख्यात गुंडांनी भरदिवसा चाकूने सपासप वार करून निघृण हत्या केली. हा थरार गुरुवारी (दि.३०) दुपारी पावणेएकच्या सुमारास मुकुंदवाडी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भाजीमंडई परिसरात घडला. हप्ता वसुलीच्या वादातून ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. किशोर रावसाहेब हिवाळे (२४, रा. राजनगर, मुकुंदवाडी) असे मृताचे नाव आहे.

Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar crime : बीड बायपासवर लुटारू तृतीयपंथीच्या टोळीकडूनच वकिलाची हत्या

याप्रकरणी गुन्हे शाखेने कुख्यात गुंड दत्ता गणपत रोकडे (३८), शुभम सिद्धार्थ रणशूर आणि कांतीलाल दौलतराव भुईगळ (५५, तिघेही रा. न्यू मसनतपूर, एमआयडीसी चिकलठाणा) या तिघांना अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.

कुख्यात गुन्हेगार दत्ता रोकडे, त्याचा साथीदार रणशूर आणि भुईगळ हे गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास उभे होते. काही वेळाने दारूच्या दुकानाकडून किशोर बाहेर पडला. रणशूर आणि भुईगळ त्याला मारण्यासाठी रॉड, दांडा शोधत होते. तेवढ्यात रणशूरला रॉड सापडला. तोपर्यंत रोकडेने किशोरला बोलावून घेत त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. रणशूरने रॉडने थेट रोहितवर हल्ला केला.

Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar crime : बीड बायपासवर लुटारू तृतीयपंथीच्या टोळीकडूनच वकिलाची हत्या

रोकडेनेही चाकूने किशोरवर सपासप वार केले. त्याच्या पोटात एकापाठोपाठ खुपसून त्याला गंभीर जखमी केले. भरबाजारपेठेत हा थरार सुरू होता. किशोर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर तिन्ही आरोपींनी तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. फॉरेन्सिक पथक सायंकाळी पाच वाजता घटनास्थळी दाखल झाले होते.

किशोरची हत्या केल्यानंतर निर्वावलेला दत्ता रोकडे साथीदारांसह पसार झाला होता. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अर्जुन कदम, हवालदार राजेंद्र साळुंके, श्रीकांत काळे, योगेश गुप्ता आणि मनोहर गीते यांच्या मुसक्या आवळल्या. तर एपीआय भरत पाचोळे यांनी शुभमला बेड्या ठोकल्या. तर भुईगळलाही ताब्यात घेतले.

हप्ता वसुलीवरून वाद

जालना रोडवरील एपीआय कॉर्नर भागात एका कापड विक्रेत्याकडे रोकडे दोन्ही साथीदारांसोबत गेला होता. त्याने विक्रेत्याला दमदाटी करून दोन ड्रेस घेतले आणि तिथेच एका व्यक्तीचा मोबाईलही हिसकावला. तिथे किशोरही आला होता. दरम्यान, सकाळीच किशोरने आपल्याला चाकू दाखवून धमकावल्याची तक्रार त्या विक्रेत्याने रोकडेकडे केली.

त्यावरून दत्ता आणि किशोर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. किशोरने दत्ताला धक्का दिल्याने तो खाली पडला. आपला अपमान झाल्याच्या रागातून किशोरला दारू पिण्यासाठी चल म्हणत चौघेही मुकुंदवाडी ठाण्याजवळील देशी दारूच्या दुकानात गेले. तिथेच याच वादातून तिघांनी किशोरची हत्या केल्याचा अंदाज पोलिस सूत्रांनी वर्तविला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news